Panaji News : सडलेल्या तांदूळ चौकशीप्रकरणी तिघे कर्मचारी कारवाईच्या फेऱ्यात

निष्काळजीपणाचा ठपका : फाईल सचिवांकडे आठवडाभर पडून
Civil Supplies Department
Civil Supplies Department Gomantak Digital Team

मुरगाव व सासष्टी तालुक्यातील नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातील सडलेल्या तांदूळप्रकरणी करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत निरीक्षक व गोदामाचे प्रमुख मिळून तीन कर्मचारी कारवाईच्या फेऱ्यात आहेत. ही चौकशीची फाईल सध्या खात्याच्या सचिवांकडे पडून आहे. या कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊन त्यांची सखोल चौकशी सुरू केली जाईल, अशी माहिती खात्यातील सूत्राने दिली.

गेल्या महिन्यात नागरी पुरवठा खात्याकडून मुरगाव, सासष्टी तसेच सांगे तालुक्यातील काही स्वस्त धान्याच्या दुकानधारकांना कीड लागलेला तांदूळ वितरित करण्यात आला होता. स्वस्त धान्याच्या दुकानधारकांनी याविरुद्ध आवाज उठविल्यानंतर खात्याचे अधिकारी खडाडून जागे झाले होते. ज्या गोदामातून या तांदळाच्या गोणींचे वितरण झाले होते. त्याची संचालकांनी तसेच संबंधित तालुक्याच्या निरीक्षकांनी तपासणी केली होती.

Civil Supplies Department
Goa Monsoon Predication 2023 : यंदा राज्यात कोसळणार मुबलक पाऊस

त्यावेळी गोदामात सडलेल्या तांदळच्या काही गोणी आढळून आल्या होत्या. यासंदर्भात संचालकांनी त्याची कबुली दिली होती. त्यामुळे हा तांदूळ सडण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाने खात्याच्या संचालकांना घेराव घालून केली होती. या संचालकांनी सात दिवसांत चौकशी अहवाल तयार करून खात्याच्या सचिवांकडे पाठवण्याचे आश्‍वासन दिले होते.

Civil Supplies Department
There is a need to set up residential school for special abled - CM | Goa News | Gomantak TV

नागरी पुरवठा खात्याच्या संचालकांनी मुरगाव, सासष्टी व सांगे तालुक्यातील ज्या गोदामातून सडलेला तांदूळ वितरित झाला होता त्या गोदाम प्रमुखांना व संबंधित तालुक्यातील निरीक्षकांना मेमो पाठवला होता. त्यांच्याकडे यासंदर्भात स्पष्टीकरण मागवण्यात आले होते. त्यांच्या स्पष्टीकरणाच्या आधारावर संचालकांनी चौकशी अहवाल तयार करून त्यातील तीन कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवून पुढील कारवाईसाठी फाईल खात्याच्या सचिवांकडे पाठवण्यात आली होती. सचिवांकडे ही फाईल गेला आठवडाभर पडून आहे. या तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई त्यामुळे अटळ आहे.

Civil Supplies Department
G20 Summit Goa 2023: सौदी अरेबियाचे राजपुत्र G 20 बैठकीसाठी गोव्यात दाखल

याआधी तूरडाळीची नासाडी

यापूर्वी कोविड काळात गोदामामध्ये साठा करून ठेवलेल्या तूरडाळीची नासाडी झाली होती. तिची चौकशी दक्षता खात्यामार्फत सुरू आहे. तेव्हा या खात्याचे माजी संचालक सिद्धिविनायक नाईक यांना निलंबित करण्यात आले होते व अजूनही त्यांना सेवेत दाखल करून घेण्यात आलेले नाही.

Civil Supplies Department
Goa Beach Shacks: किनारपट्टी भागातील तीस टक्के शॅक्स दिल्लीवाल्यांकडे- खंवटे

गोणींची तपासणी झाली नव्हती!

नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातील धान्यसाठा वितरित करण्यापूर्वी त्याची तपासणी करण्याची जबाबदारी ही तेथील गोदाम प्रमुख तसेच निरीक्षकाचीही असते. मात्र, या कामाकडे संबंधित कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष झाले होते. जरी हा धान्यसाठा भारतीय अन्न महामंडळाकडून आला तरी त्यातील काही गोणींची तपासणी करणे गरजेचे असते. मात्र, ती करण्यात आली नव्हती, असे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com