Goa Beach Music Party: 'त्या' नागरिकांना मिळाली तब्बल पंधरा वर्षानंतर शांत झोप; न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत

मोरजी, हरमल, मांद्रे, केरी किनाऱ्यावरील पोलीस बंदोबस्ताने नागरिकात समाधान
Beach Music Party
Beach Music PartyDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: मुंबई उच्च न्यायालयाने किनारी भागातील खुल्या जागेत रात्री 10 नंतर कोणत्या प्रकारचे संगीत वाजल्यास स्थानिक पोलीस अधिकारी तालुका उपजिल्हाधिकारी यांना दोषी ठरवत कारवाई केली जाईल, असा आदेश दिला आहे. यामुळे पेडणे पोलीस निरीक्षक दत्ताराम राऊत यांनी 1 डिसेंबर रोजी सर्व सॅक नाईट व्यावसायिक क्लब यांची बैठक बोलावत इशारा दिला. व कडक बंदोबस्त ठेवल्याने किनारी भागातील नागरिकांनी या आदेशाचे स्वागत केले.

(Bombay High Court has ordered the police to take action if music is played after 10 pm in Goa coastal areas)

न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला. त्यामुळे 1 डिसेंबर रोजी रात्री मोरजी, हरमल, मांद्रे, केरी या किनारी बंदोबस्त ठेवला गेला. अन् शॅक्स, रेस्टॉरंट, किंवा नाईटक्लबमध्ये ध्वनी प्रदूषणाचे करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याने पंधरा वर्षानंतर किनारी भागात रात्री दहानंतर ध्वनी प्रदूषण झाले नाही. त्यामुळे स्थानिकांना शांत झोप मिळाली आहे. असे एका नागरीकाने सांगितले.

पर्यटन हंगाम म्हटल्यानंतर सर्वत्र गोंगाट ध्वनी प्रदूषण, ड्रग्स पार्ट्या, रेव पार्ट्या, संगीत यांचा समावेश किनारी भागात असतो. मात्र अशा प्रकाराने जनता वैतागली होती. कर्ण कर्कश आवाजाने स्थानिकांची झोपमोड होतेच. शिवाय आलेले पर्यटकही घरे दुकाने खोल्या सोडून दूर ठिकाणी जातात. मात्र न्यायालयाच्या आदेशाने किनारी भाग शांत झाला आहे.

Beach Music Party
Illegal Construction: गोवा खंडपीठाची धडक कारवाई; नियमबाह्य बांधकाम पाडण्याचा आदेश

मिळालेल्या माहितीनुसार न्यायालयाच्या आदेशाने काल कोणत्याच प्रकार संगीत मोरजी, आश्वे, मांद्रे , हरमल, केरी या किनारा भागात ऐकायला मिळाले नाही. त्यामुळे नागरिक तब्बल पंधरा वर्षानंतर शांत झोपू शकले. यावर हरमल येथील नागरिक उदय वायगणकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, पर्यटन हंगाम म्हटल्यानंतर किनारी भागात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या पार्ट्यांचा अनुभव घेतला. व अशीच पोलिसांनी कारवाई सुरु ठेवावी अशी मागणी यावेळी केली आहे.

Beach Music Party
Goa police: अमली पदार्थविरोधी कारवाईचा धडाका सुरूच; हणजूण, मडगाव येथील तिघे जेरबंद

मोरजी येथील सदानंद शेट्ये यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, मागच्या पंधरा वर्षापासून मोरजीकिनारी भागात धिंगाणा सुरू असत, 10 नंतर सुरु झालेल्या पार्ट्या पहाटेपर्यंत चालायच्या आणि सर्वत्र ध्वनी प्रदूषण, पार्किंग व्यवस्था, वाहतुकीची कोंडी आणि स्थानिकांची झोपमोड विद्यार्थ्यांच्या अभ्यास, यांना अडचणी निर्माण होत, तसेच सर्वसामान्य नागरिक हैराण झाले होते. मात्र न्यायालयाच्या आदेशाने सर्व बदलले असे मत सदानंद शेट्ये यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com