Goa: जिल्हा न्यायालयात आजी-माजी खासदार-आमदारांवर 22 प्रकरणे, हायकोर्टातही 2 खटले प्रलंबित

Bombay High Court Goa bench report: गोवा येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने विद्यमान व माजी खासदार आणि आमदारांविरोधातील गुन्हेगारी प्रकरणांचा तपशील असलेले दोन अहवाल जाहीर केले आहेत.
Bombay High Court Goa bench report
Bombay High Court Goa bench reportDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने विद्यमान व माजी खासदार आणि आमदारांविरोधातील गुन्हेगारी प्रकरणांचा तपशील असलेले दोन अहवाल जाहीर केले आहेत.

जून आणि जुलै २०२५ महिन्यांतील अहवालानुसार उत्तर व दक्षिण गोव्याच्या जिल्हा न्यायालयांमध्ये एकूण २२ प्रकरणे तर उच्च न्यायालयात दोन प्रकरणे प्रलंबित आहेत. जुलै २०२५ च्या अहवालानुसार उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दिगंबर कामत व चर्चिल अलेमांव विरोधातील प्रकरणे आणून दोन्ही याचिका ‘फॉर ऑर्डर्स’ टप्प्यात आहे.

Bombay High Court Goa bench report
Goa khazan Land Regularisation: आता खाजन जमिनीतील बांधकामे होणार नियमित, 2011 अधिसूचनेपूर्वीची बांधकामे कायदेशीर

जून २०२५ च्या अहवालानुसार उत्तर गोव्यातील जिल्हा न्यायालयांमध्ये १४ प्रकरणे प्रलंबित असून, माविन गुदिन्हो व आतानासियो मोन्सेरात यांच्याविरोधातील प्रकरणे ‘ट्रायल’ टप्प्यात आहेत. दिगंबर कामत व चर्चिल अलेमांवविरोधातील एक प्रकरण ‘रिपोर्ट’ टप्प्यात असून दुसरे एक प्रकरण ‘आर्ग्युमेंट्स’ टप्प्यात आहे.

दयानंद नार्वेकर यांची प्रकरणे ‘स्टेप्स’ व ‘आर्ग्युमेंट्स’ टप्प्यात आहेत. मायकल लोबो यांची प्रकरणे ‘अॅपिअरन्स’ टप्प्यात, तर केदार नाईक व वीरेश बोरकर यांची प्रकरणे ‘आर्ग्युमेंट्स’ टप्प्यात आहेत. प्रकाश वेळीप यांच्या प्रकरणांचा समावेश ‘ट्रायल’, ‘ॲपिअरन्स’ व ‘रिप्लाय’ या टप्प्यांमध्ये आहे.

Bombay High Court Goa bench report
Goa Crime: मुंगूल गँगवॉर प्रकरण, वॉल्‍टरचे दक्षिणेतील वर्चस्‍व भेदण्‍यासाठी केपे-फोंड्यातील 4 गँग एकवटल्या

दक्षिण गोव्यातील जिल्हा न्यायालयांत ८ प्रकरणे प्रलंबित असून, फ्रान्सिस्को झेविअर पाशेखो यांच्याविरोधातील काही प्रकरणे ‘ट्रायल’ व एक प्रकरण ‘ॲपिअरन्स’ टप्प्यात आहे. विजय सरदेसाई यांचे एक प्रकरण ‘आर्ग्युमेंट’ टप्प्यात आहे, तर राजेश फळदेसाई व संकल्प आमोणकर यांची प्रकरणे ‘अॅपिअरन्स’ टप्प्यात आहेत. कॅ. वेन्झी व्हिएगस यांचे एक प्रकरणही ‘आर्ग्युमेंट’ टप्प्यात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com