केवळ घटनास्थळी उपस्थिती म्हणजे गुन्हा नव्हे, हायकोर्टाचं निरीक्षण; खुनाच्या गुन्ह्यातील संशयिताला मिळाला सशर्त जामीन

Rajkumar Prasad bail Goa: राजकुमार प्रसाद (संशयित क्रमांक ४) याला सशर्त जामीन मंजूर केला आहे. गेल्या अडीच वर्षांपासून तो कोठडीत होता.
Court
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: खुनाच्या एका प्रकरणातील संशयिताची केवळ घटनास्थळावर उपस्थिती होती, हे त्याला गुन्ह्यात अडकवण्यासाठी पुरेसे नाही, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राजकुमार प्रसाद (संशयित क्रमांक ४) याला सशर्त जामीन मंजूर केला आहे. गेल्या अडीच वर्षांपासून तो कोठडीत होता.

जुने गोवा पोलिस स्थानकात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांनी हा आदेश दिला. साक्षीदारांच्या जबाबावरून असे दिसून येते की, संशयित क्रमांक १ आणि २ यांनीच मृताला लाकडी दांडक्याने मारहाण केली होती.

Court
Goa Crime: टँकर चालकावर जुन्या मालकाकडून खुनी हल्ला! पणजीतील प्रकार; संशयित समीर खानला अटक

काही साक्षीदारांनी केवळ हा संशयित तिथे उपस्थित असल्याचे म्हटले आहे; परंतु त्याव्यतिरिक्त त्याला या गुन्ह्यात थेट अडकवणारा कोणताही ठोस पुरावा सध्यातरी रेकॉर्डवर नाही. संशयिताने दुचाकी उसने घेतल्याचा दावा आणि सीसीटीव्ही फुटेजचा तपास न्यायालयाने केला. मात्र, संशयिताने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मुख्य संशयितांना मदत केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून सिद्ध होत नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

Court
Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा वाढला! पारा 34 अंशांवर, घामाच्या धारांनी गोवेकर हैराण

याच प्रकरणातील अन्य एक संशयित अखिलेश सहानी याला यापूर्वीच जामीन मिळाला आहे. राज कुमार प्रसाद याची भूमिकाही त्याच्यासारखीच असल्याने समानतेच्या तत्त्वावर त्याला जामीन मिळण्यास तो पात्र ठरला. संशयित २९ ऑगस्ट २०२३ पासून तुरुंगात आहे. या खटल्यात ६२ साक्षीदार असून आतापर्यंत केवळ एकाचीच साक्ष पूर्ण झाली आहे, याचीही न्यायालयाने दखल घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com