Anjuna Noice Pollution: हणजूणमधील ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी तीन पोलिस पथके तैनात; राज्‍य सरकारची गोवा खंडपीठाला माहिती

Goa Bench of Mumbai High Court: प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयातूनही हणजूण परिसरातील काही रेस्टॉरंट्स तसेच पब्समधील ध्वनीवर देखरेख ठेवली जाणार आहे.
Anjuna Noice Pollution: हणजूणमधील ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी तीन पोलिस पथके तैनात; राज्‍य सरकारची गोवा खंडपीठाला माहिती
Goa Bench of Mumbai High Court Dainik Gomantak
Published on
Updated on

हणजूण परिसरात रात्री उशिरापर्यंत ध्वनिप्रदूषण होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्‍याची दखल घेऊन ध्‍वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्‍याबरोबरच कारवाईसाठी सरकारने तीन विशेष पोलिस पथके रात्रीच्या वेळी गस्तीवर तैनात केली आहेत. हणजूण पोलिसांकडे तक्रार आल्यापासून अर्ध्या तासात कारवाई करणे बंधनकारक असेल. प्रदूषण नियंत्रण मंडळही ध्वनिप्रदूषणावर देखरेख ठेवणार आहे, अशी माहिती सरकारने आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिली.

ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कारवाईसाठी स्थानिक हणजूण पोलिसांव्यतिरिक्त म्हापसा उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी उपनिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली इतर तीन पोलिस पथके स्थापन केली आहे. ही पथके हणजूण परिसरात रात्री १० वाजल्यानंतर गस्तीवर असतील. जेथे संगीताचा आवाज आयोजकांना दिलेल्या परवानगीच्या प्रमाणापेक्षा अधिक असेल तर कारवाई केली जाईल.

Anjuna Noice Pollution: हणजूणमधील ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी तीन पोलिस पथके तैनात; राज्‍य सरकारची गोवा खंडपीठाला माहिती
Sunburn Festival : सनबर्न ईडीएम महोत्सवात ध्वनीप्रदूषण; सरकारी यंत्रणांवर हायकोर्टाची नाराजी

हणजूण पोलिसांना इमेलद्वारे तसेच फोनवर येणाऱ्या तक्रारींची नोंद केली जाणार आहे. जर ३० मिनिटांत कारवाई झाली नाही तर तक्रारदारांना उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्‍या मोबाईल क्रमांकावर तक्रार करता येईल. हणजूण पोलिस स्थानक निरीक्षक, विशेष पोलिस पथकातील उपनिरीक्षक तसेच उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक प्रसिद्ध केले जातील. त्यामुळे ध्वनिप्रदूषण करणारे हणजूण परिसरातील पब्स व रेस्टॉरंट्सवर कारवाई करण सोपे होणार आहे. कारवाईवेळी ध्वनिप्रदूषण झाल्याचे उघड झाल्यास तेथील साऊंड सिस्टीम जप्त करण्यात येऊन संबंधित रेस्टॉरंट्स किंवा पब्सविरोधात गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिली.

Anjuna Noice Pollution: हणजूणमधील ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी तीन पोलिस पथके तैनात; राज्‍य सरकारची गोवा खंडपीठाला माहिती
Pollution Control Board: चार मांस विक्रेत्यांचे नोटिसांना आव्हान; २१ जणांचे गोवा प्रदूषण मंडळाकडे परवान्यासाठी अर्ज

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयातूनही हणजूण परिसरातील काही रेस्टॉरंट्स तसेच पब्समधील ध्वनीवर देखरेख ठेवली जाणार आहे. ध्वनिप्रदूषण झाल्याचे आढळून आल्यास मंडळ त्याची माहिती हणजूण पोलिसांना देईल. त्यानुसार पोलिस त्‍वरित त्या ठिकाणी जाऊन कारवाई करतील. वारंवार तक्रारी येणाऱ्यांची नावे देण्याचे तोंडी निर्देश उच्च न्यायालयाने याचिकादार व ॲमिकस क्युरींना दिले. त्यानुसार ही माहिती उच्च न्यायालयाला दिली जाणार असल्याने सुनावणी शुक्रवारी ३० ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com