वास्को, दाबोळी विमानतळावर ‘बॉम्ब’ असल्याचा इ-मेल प्राप्त झाल्यामुळे विमानतळ प्राधिकरणाची एकच धावपळ उडाली व मोपा, दाबोळी विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था सतर्क झाली.
परंतु नंतर बॉम्ब ठेवल्याची ती अफवाच ठरली. बॉम्बसंदर्भात इ-मेल आल्याच्या माहितीस विमानतळ संचालक धनंजय राव यांनी दुजोरा दिला असून यासंबंधी अधिक तपासणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
आज सकाळी दाबोळी विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा इ-मेल दाबोळी विमानतळ प्राधिकरणाला मिळताच तातडीने सुरक्षा दलास ‘अलर्ट’ करण्यात आले. असा इ-मेल देशातील १३ विमानतळांनाही पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने वास्को पोलिस विभाग, सीआयएसएफ, एटीएस, अग्निशमन दल आणि इतर एजन्सीच्या शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांनी श्वानपथकांसह कसून शोध घेतला.
दरम्यान, विमानतळ संचालक धनंजय राव यांनी सांगितले की, विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली असली, तरी विमान उड्डाणांवर परिणाम झालेला नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.