Bhumi Pednekar: भूमी पेडणेकरचं 'गोवा व्हेकेशन'! मित्रांसोबत घेतेय सुट्ट्यांचा आनंद; स्टायलिश आणि बोल्ड अंदाजातील फोटो केले शेअर

Bhumi Pednekar Goa Vacation: बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या गोव्यात आहे. ती आपल्या मित्रांसोबत गोव्यात सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटत आहे.
Bhumi Pednekar Goa Vacation
Bhumi PednekarDainik Gomantak
Published on
Updated on

Bhumi Pednekar Goa Vacation: बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या गोव्यात आहे. ती आपल्या मित्रांसोबत गोव्यात सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटत आहे. तिने आपल्या या खास क्षणांचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले असून ते सोशल मीडियावर (Social Media) चांगलेच व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये भूमीचा स्टायलिश आणि बोल्ड अंदाज पाहून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

बिकिनीतील बोल्ड अंदाजाने वेधले लक्ष

दरम्यान, भूमीच्या गोवा (Goa) ट्रिपमधील फोटोंमध्ये तिचा स्विमिंग पूलमधील बिकिनीतील अंदाज खूपच लक्षवेधी आहे. तिने ब्लू बिकिनीमधील काही फोटो शेअर केले, ज्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या फोटोंमध्ये तिचा आत्मविश्वास आणि गॉर्जियस लूक चाहत्यांना मोहिनी घालत आहे.

Bhumi Pednekar Goa Vacation
Bhumi Pednekar: गोव्याचा प्लॅन करताय मग भूमी पेडणेकरच्या आलिशान हॉटेलला नक्की भेट द्या

स्टायलिश आणि दिलखेचक लूक

भूमीने केवळ बिकिनीमधील नाहीतर इतरही अनेक स्टायलिश लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये ती पिवळ्या रंगाच्या मिडी ड्रेसमध्ये दिसत आहे. मोकळे केस आणि कमीत कमी मेकअपमध्ये तिचा हा लूक खूपच सुंदर दिसत आहे. याशिवाय, पावसाळ्याच्या वातावरणाचा आनंद घेताना तिने पांढऱ्या टी-शर्टमध्ये केस बांधून भजी खातानाचा एक कॅज्युअल फोटोही शेअर केला आहे.

याव्यतिरिक्त, भूमीने आपल्या सुट्ट्यांमध्ये पुस्तक वाचताना आणि मित्रांसोबत डिनरचा आनंद घेतानाचे फोटोही शेअर केले आहेत. तिचे हे विविध मूड्स आणि स्टाईल चाहत्यांना खूपच आवडल्या असून, ते तिचे कौतुक करत आहेत.

Bhumi Pednekar Goa Vacation
HBD Bhumi Pednekar : पहिल्या चित्रपटाच्या मानधनाने भरली होती बहिणीची फी...या अभिनेत्रीला आजही त्याचा अभिमान आहे

व्यवसायाच्या जगात पहिले पाऊल

दुसरीकडे, अभिनयासोबतच भूमीने आता व्यवसायाच्या जगातही पहिले पाऊल टाकले आहे. तिने नुकताच आपली बहीण समीक्षा पेडणेकरसोबत 'बॅकबे' (Backbae) नावाचा एक ब्रँड लॉन्च केला आहे. हा ब्रँड नॅचरल मिनरल वॉटरसाठी आहे. भूमी आता अभिनेत्रीसोबतच उद्योजिका म्हणूनही ओळख मिळवत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com