Bodgeshwar Jatra: वाढीव शुल्काच्या निषेधार्थ बोडगेश्वर जत्रेत गोंधळ; दोन तास दुकाने बंद

Mapusa: देवस्थान समितीसोबत झालेल्या चर्चेअंती व्यापाऱ्यांनी ही फेरी पूर्ववत केली.
Bodgeshwar Jatra
Bodgeshwar Jatra Dainik Gomantak
Published on
Updated on

Bodgeshwar Jatra: म्हापसा येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री देव बोडगेश्वर जत्रोत्सवात कथित वाढीव शुल्क आकारणीच्या निषेधार्थ येथील फेरीतील दुकानदारांनी आपली दुकाने दोन तास बंद ठेवली. नंतर देवस्थान समितीसोबत झालेल्या चर्चेअंती व्यापाऱ्यांनी ही फेरी पूर्ववत केली.

उपलब्ध माहितीनुसार, शनिवारी (ता.7) जत्रोत्सवातील दुकानदारांनी कथित वाढीव शुल्काबाबत आक्रमक भूमिका घेत आपापली दुकाने बंद केली. यामध्ये छोट्या दुकानदारांपासून मोठ्या व्यापाऱ्यांचा समावेश होता.

सायंकाळी 5 वा.च्या सुमारास फेरीतील दुकानदारांनी आपली आस्थापने बंद केली, त्यामुळे काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

याशिवाय काही विक्रेत्यांनी एकत्र येत संपूर्ण फेरीमध्ये व्यापाऱ्यांना दुकाने निषेध म्हणून बंद ठेवण्यास सांगितले. त्यानुसार अनेकांनी आस्थापने बंद केली, तर काहींनी यास आक्षेप घेतल्याने काही व्यापाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली.

या घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. कालांतराने या व्यापाऱ्यांनी बोडगेश्वर देवस्थान समितीशी चर्चा केली. यावेळी समितीने व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकत यावर सुवर्णमध्य काढला.

तसेच म्हापसा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांशीदेखील शुल्काबाबत चर्चा केली. देवस्थान समितीने या व्यापाऱ्यांच्या शंकाचे निरसन केल्यानंतर दुकानदारांनी फेरी दोन तासांनंतर सायंकाळी 7वा.च्या सुमारास पुन्हा चालू केली.

सोपो परवडणारा नाही

जत्रोत्सवात देवस्थान समिती, म्हापसा पालिका तसेच जागेचे शेतकरीही शुल्क घेतात. परंतु हा सोपो परवडणारा नाही. इतके शुल्क घेऊन आम्हाला स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून प्रसाधनगृहाचीही व्यवस्था नसते, असा आरोपही काही दुकानदारांनी यावेळी केला.

दर परवडणारे नाहीत

दुकानदार परेश खानविलकर यांनी जत्रोत्सवात दुकाने थाटून व्यवसाय करणे मेहनतीचे काम असते. मात्र, देवस्थान समिती, म्हापसा पालिका तसेच जागेचे शेतकरीही आमच्याकडून वाढीव शुल्क घेताहेत, असा दावा केला. मुळात हे दर परवडणारे नाहीत. त्यामुळे आम्ही निषेध म्हणून या फेरीतील दुकाने बंद ठेवली.

Bodgeshwar Jatra
Shankar Mahadevan: ‘दिल चाहता है’ म्हणजे गोवा! शंकर महादेवन यांनी जागवल्या गोव्याच्या आठवणी

जत्रेत कागदी पिशव्यांचे वितरण

शाळकरी विद्यालयांनी बनवलेल्या कागदी पिशव्यांचे म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर जत्रोत्सवात वितरण करण्यात आले. रोटरॅक्ट क्लब ऑफ म्हापसा यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. एकूण 84,000 पिशव्या या जत्रेत वाटप करण्यात आल्या.

या उपक्रमासाठी जी.एस. आमोणकर विद्या मंदिर, ज्ञानप्रसारक विद्यालय, सेंट ब्रिटो, सेंट मेरी, गणेश विद्या मंदिर, जनता हायस्कूल, एसएफएक्स हायस्कूल, सारस्वत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात आली.

हा वाद फक्त गैरसमज व चुकीचा संदेश व्यापाऱ्यांपर्यंत गेल्याने झाला. फेरीतील दुकानदारांनी शुल्क आकारणीसंदर्भात गैरसमज करून घेतला. याविषयी आम्ही व्यापाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या शंकाचे निरसन केल्यानंतर हा प्रश्न सुटला. - आनंद भाईडकर, बोडगेश्वर देवस्थानचे अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com