Goa Beaches: धक्कादायक! किनाऱ्यांच्या Blue Flag मानांकनासाठी सरकारकडून प्रस्ताव नाही; दीड वर्षे प्रशासन ढिम्म

Goa Beaches Blue Flag Status: ‘ब्ल्यू फ्लॅग’ हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र आहे, जे समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेस, पर्यावरणीय व्यवस्थापनास, पाणी गुणवत्तेस आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी दिले जाते.
Goa Beaches Blue Flag Status
Goa Beaches Blue Flag StatusDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मिरामार येथील किनाऱ्याला ‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकन मिळवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर गेल्या दीड वर्षात राज्य सरकारकडून नवा प्रस्तावच सादर झाला नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. देशात ब्ल्‍यू फ्लॅग मानांकन मिळवण्यासाठीची प्रक्रिया राबवण्यासाठी असलेल्या कार्यालयातील माहितगार सूत्रांनी ही माहिती दिली.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने दोन-तीन वेळा बैठकांत काही किनाऱ्यांचा उल्लेख जरूर केला होता. मात्र, त्यासंदर्भात कोणताही ठोस प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. देशातील इतर राज्ये एकाहून अधिक किनाऱ्यांना ‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

हे मानांकन मिळवण्यासाठी काही निकष आहेत. त्यांची पूर्तता करण्यात आल्यानंतरच ‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकनासाठी अशा किनाऱ्यांची शिफारस केली जाते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पथकाकडून निरीक्षण केल्यावर मानांकन दिले जाते.

Goa Beaches Blue Flag Status
Goa Beaches: किनाऱ्यांच्या Blue Flag मानांकनाकडे गोवा सरकारचे दुर्लक्ष? प्रस्ताव न पाठवल्याची माहिती उघड; कर्नाटक आघाडीवर

‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकन म्हणजे काय?

‘ब्ल्यू फ्लॅग’ हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र आहे, जे समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेस, पर्यावरणीय व्यवस्थापनास, पाणी गुणवत्तेस आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी दिले जाते. डेन्मार्कमधील ‘फाउंडेशन फॉर इन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन’ या संस्थेमार्फत हे मानांकन दिले जाते.

‘ब्ल्यू फ्लॅग’ मिळवण्यासाठी समुद्रकिनाऱ्याने ठरावीक ३३ निकष पूर्ण करणे आवश्यक असते, ज्यात स्वच्छता, पर्यावरण जागरूकता कार्यक्रम, जैवविविधतेचे संवर्धन व पर्यटनासाठी योग्य सुविधा यांचा समावेश असतो. त्यामुळे एखाद्या किनाऱ्याला ‘ब्ल्यू फ्लॅग’ मिळणे म्हणजे तो जागतिक दर्जाचा, सुरक्षित व पर्यावरणपूरक असल्याची अधिकृत मान्यता मिळणे होय.

Goa Beaches Blue Flag Status
Blue Economy: 'ब्ल्यू ईकॉनॉमी’साठी गोवा विद्यापीठाचा जर्मन संस्थेशी करार! स्थानिकांना लाभ मिळवून देण्यासाठी होणार प्रयत्न

‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकनाचे फायदे

‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकन मिळाल्याने संबंधित समुद्रकिनाऱ्याला जागतिक स्तरावर विशेष ओळख मिळते, ज्यामुळे तेथे पर्यटक आकर्षित होतात. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि पर्यटन व्यवसाय वाढतो.

तसेच या मानांकनामुळे किनाऱ्याच्या स्वच्छतेची, सुरक्षा व्यवस्थेची आणि पर्यावरण रक्षणाच्या उपाययोजनांची सातत्याने निगराणी केली जाते, जे स्थानिक समुद्री परिसंस्थेच्या टिकावाला हातभार लावते. या सर्वामुळे संबंधित परिसराचा शाश्वत विकास घडतो आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर त्या ठिकाणाची प्रतिष्ठा वाढते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com