2 वेळा ब्रेन ट्युमरशी झुंज, त्यातून आलेले अंधत्व; अंधारातून उजेडाचा मार्ग निवडणार पर्पल फेस्टचा ब्रॅंड ॲम्बेसिडर 'प्रथमेश'

Prathamesh Sinha Purple Fest Goa: डोळ्यांची दृष्टी हरवली, पण त्याच्या मनातील उजेड मात्र कधीच मावळला नाही. वयाच्या १४ व्या वर्षी, जीवनातील संकटांशी झुंज देत प्रथमेशने अंधारातूनच उजेडाचा मार्ग स्वत:च शोधला.
Prathamesh Sinha Purple Fest Goa
Prathamesh Sinha Purple Fest GoaDainik Gomantak
Published on
Updated on

सचिन कोरडे

डोळ्यांची दृष्टी हरवली, पण त्याच्या मनातील उजेड मात्र कधीच मावळला नाही. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी, जीवनातील संकटांशी झुंज देत प्रथमेश सिन्हाने अंधारातूनच उजेडाचा मार्ग स्वत:च शोधला. गोव्यात सुरू असलेल्या ‘पर्पल फेस्ट’चा आज तो ब्रॅंड ॲम्बेसिडर आहे पण त्याहूनही मोठे म्हणजे आत्मविश्वास आणि जिद्दीचे तो प्रतीक आहे. जग त्याला दिसत नाही, पण जगाला काही तरी नवे पाहायला तो शिकवतोय.

प्रथमेश दीड वर्षाचा होता तेव्हा त्याच्यावर ‘ब्रेन ट्यूमर’ची शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यामुळे त्याची दृष्टी अंधुक व्हायला लागली. सामान्य शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांना लढा द्यावा लागला होता.

प्रथमेश २०१९ पर्यंत घरीच शिक्षण घेत होता. ‘पूना स्कूल आणि होम फॉर द ब्लाइंड’ मध्ये त्याला दाखल केले होते, तिथे तो ‘थिंकरबेल लॅब्स’ च्या टीमला भेटला आणि ‘ॲनी’ बद्दल त्याने माहिती जाणून घेतली. (ANNIE- ही सर्वांना परवडणारी एडटेक आहे जी दृष्टीबाधितांसाठी खेळाच्या माध्यमातून साक्षरता आणते.) कोरोनाकाळात शाळा बंद असताना त्याने ‘ॲनी’ चा वापर करायला सुरुवात केली आणि आज तो त्याचा आज चक्क ‘ब्रँड ॲम्बॅसडर’ बनला आहे.

२०१९ मध्ये त्याच्यासोबत पुन्हा एक दुर्दैवी घटना घडली. प्रथमेशला पुन्हा ट्यूमर झाल्याचे निदान झाले आणि त्याला ‘रेडिएशन’ साठी रुबी हॉल क्लिनिकमध्ये जावे लागले. त्याच्या बोलण्यातून तिथले लोक प्रेरीत होत असत. त्यामुळे तो रुग्णालयात इतका प्रसिद्ध झाला की डॉक्टर त्याला उचलून त्यांच्या रुग्णांशी बोलण्यासाठी घेऊन जायचे.

Prathamesh Sinha Purple Fest Goa
Purple Fest: 'पर्पल फेस्ट'मधून आनंदाचा संदेश! दिव्यांगांचा रंगारंग कार्यक्रम रंगला; डिसेंबरमध्ये कर्नाटकही करणार साजरा

‘बोन मॅरो दान’ मोहिमेत वक्ता म्हणून त्याला बोलावण्यात आले आणि त्यानंतर त्याला वक्ता म्हणून बोलण्याच्या अनेक संधी मिळाल्या. ‘माझा प्रथमेश आज अनेकांसाठी आदर्श आहे’, असे सांगताना त्याची आई दीपशिखाचे आनंदांश्रू सहज बाहेर पडतात.  

‘पर्पल फेस्ट’ चा ब्रॅड ॲम्बेसिडर म्हणून माझी निवड केली गेली त्याबद्दल मी गोवा सरकारचा खूप आभारी आहे. उद्‌घाटन समारंभात मला व्यासपीठावर बोलवले गेले, माझा आदरसत्कार केला गेला हे माझ्यासाठी विशेष होते. हा महोत्सव केवळ दिव्यांगांनाच प्रेरणा देणारा नाही तर इतरांचाही आत्मविश्वास वाढविणार आहे.

प्रथमेश सिन्हा

Prathamesh Sinha Purple Fest Goa
International Purple Fest 2025: गोव्यातील समुद्रकिनारे आणि सार्वजनिक इमारती दिव्यांग-सुलभ बनवणार; मुख्यमंत्री सावंत यांची ग्वाही

सन्मान आणि पुरस्कार 

प्रथमेश पुण्यात राहतो. तो थिंकर बेल कंपनीचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे जे दृष्टिहीन लोकांसाठी ब्रेल लर्निंग साधने बनवतात. २०२२ मध्ये तो ‘शार्क टँक’ या प्रसिद्ध शोमध्येसुद्धा झळकला होता. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत ‘ॲलिमको’ या कंपनीचाही तो ब्रँड ॲम्बेसेडर आहे. प्रथमेशला राष्ट्रपतींच्या हस्ते २०२४ चा ‘श्रेष्ठ दिव्यांग बालक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. ‘टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ’ आणि ‘रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन’ तर्फे सी-पॉझिटिव्ह अवॉर्ड ने त्याला सन्मानित करण्यात आले आहे. तो एक अध्यात्मिक वक्ता असून श्रीमद्भगवदगीता, शिव तांडव स्तोत्र, रामरक्षा स्तोत्र, अथर्वशीर्ष आणि इतर अनेक श्लोकांचे तो पठण करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com