Black Panther Death: कोने-प्रियोळजवळ दुर्मिळ 'ब्लॅक पॅन्थर'चा अपघाती मृत्यू, वनमंत्री राणेंकडून सखोल चौकशीचे आदेश

Goa Black Panther Death In Konem Priyol: कोने-प्रियोळ मार्गावर वाहनाच्या धडकेत एका ब्लॅक पॅन्थरचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
Black Panther Death
Black Panther DeathDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कोने-प्रियोळ येथे वाहनाच्या धडकेत एका ब्लॅक पॅन्थरचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी संबंधित वन अधिकाऱ्यांना तातडीने सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात पोलिसांचीही मदत घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

रस्त्यावरून जात असताना एका वाहनानं ब्लॅक पॅन्थरला जोरदार धडक दिली. अपघातानंतर तात्काळ उपचारासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र दुखापत गंभीर असल्यानं उपचारादरम्यान पँथरचा मृत्यू झाला.

वाहनाने ब्लॅक पॅन्थरला धडक दिली. उपचारासाठी पोहोचलेल्या वन विभागाच्या टीमने पँथरला वाचवण्याचे प्रयत्न केले, मात्र गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला.

Black Panther Death
Goa Unemployment: ..कुणी नोकरी देता का नोकरी? गोव्यातील काळजी वाढवणारे चित्र; 56276 उच्चशिक्षित बेरोजगार युवक

दरम्यान, वनमंत्री राणे यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त करत, सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

ब्लॅक पॅन्थर हा जगातील अत्यंत दुर्मिळ वन्यजीव आहे. ‘ब्लॅक पँथर’ ही बिबट्यांची अत्यंत दुर्मिळ प्रजाती आहे. खोल जंगलात राहणाऱ्या या ब्लॅक पँथरचं क्वचितच दर्शन होतं. ब्लॅक पॅन्थरचे शरीर साधारणपणे 4.5 ते 6 फीट लांब असते.

Black Panther Death
Goa Unemployment: ..कुणी नोकरी देता का नोकरी? गोव्यातील काळजी वाढवणारे चित्र; 56276 उच्चशिक्षित बेरोजगार युवक

सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यांत घनदाट जंगलामध्ये ब्लॅक पॅन्थर आढळून आले आहेत. ब्लॅक पॅन्थर दक्षिण आशिया, आफ्रिका आणि मध्य आणि दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणात आढळून येतात. ते जंगली परिसरात, घनदाट जंगलांमध्ये आणि उंच पर्वतीय भागांमध्ये वास करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com