किमान वेतनाला ट्रेड युनियनचा विरोध; कुशल कामगारास 750 रुपये रोजची मजुरी द्या

सरकार रोजंदारीचा प्रश्‍न अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी निकालात काढेल : मोन्सेरात
Babush Monserrate
Babush MonserrateDainik Gomantak
Published on
Updated on

राज्य सरकारने रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास 550 रुपये रोजची मजुरी निश्‍चित केली होती. या निश्चितीला कामगार संघटनांनी विरोध केला.

सध्याची महागाई पाहता निश्‍चित केलेली मजुरी ही तुटपुंजी आहे. त्यामुळे किमान 750 रोजंदारी अधिक महागाई भत्ता त्यांना मिळावा, अशी मागणी अखिल भारतीय ट्रेड युनियन संघाने केल्याची माहिती ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी दिली.

आलेल्या सूचनांचा विचार करता सरकार रोजंदारीचा प्रश्‍न अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी निकालात काढेल, असे मजूर व रोजगार मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले.

Babush Monserrate
Davorlim: भगवती-दवर्ली परिसरातील 57 घरांना नोटीस

माध्यम प्रतिनिधींना माहिती देताना फोन्सेस्का म्हणाले, किमान वेतनावर मालकांच्यावतीने म्हणणे मांडण्यात आले. त्यांनी कमीत कमी वेतन 750 रुपये देता येणार नाहीत, याची कारणे सांगितली.

त्यास कामगार संघटनाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही कडाडून विरोध केला. सध्याच्या महागाईच्या काळात साडेपाचशे रुपये ही फारच कमी रक्कम आहे.

अधिसूचना मागे घ्या

सरकारच्यावतीने जे अकुशल कामगारांना 550 रुपये देण्याचे व इतर निम्न कुशल आणि कुशल कामगारांना वेतन ठरविण्यात आले व त्याची अधिसूचना काढली, ती अधिसूचना मागे घ्यावी.

रोजंदारीवर काम करणाऱ्यांना किमान 750 रुपये मिळावेत, महागाईमुळे एवढी वाढ मिळायलाच हवी, असेही आम्ही यावेळी ठणकावून सांगितल्याचे फोन्सेका म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

IIT Project In Katamgaldada
Colvale Mobile Tower
margao fatorda mega project protest
 Micky Pacheco NDZ Remarks
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com