Mayem Constituency
Mayem ConstituencyDainik Gomantak

Mayem Constituency : मये मतदारसंघात भाजपची ‘ताकद’ वाढली : प्रेमेंद्र शेट

Mayem Constituency विरोधक निष्प्रभ, डबल इंजिन सरकारवर विश्‍वास
Published on

Mayem Constituency :

डिचोली, सरकारच्या विकासात्मक कार्यांमुळे चांगले मतदान झाले. महिला, युवा मोर्चा आदी भाजप कार्यकर्त्यांचे प्रामाणिक प्रयत्न आणि मतदारांचा भाजपवरील पूर्ण विश्वास.

यामुळेच भाजपचे विजयी उमेदवार श्रीपाद नाईक यांना मये मतदारसंघातून मतांची विक्रमी आघाडी मिळाली, असा दावा मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी आज (गुरुवारी) सकाळी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला.

मयेतील निकाल पाहता, मयेत भाजपला प्रतिस्पर्धी नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, मतदारांनी डबल इंजिन सरकारवर विश्‍वास ठेवला, असे प्रेमेंद्र शेट यांनी स्पष्ट केले.

मयेतील विक्रमी कामगिरीबद्दल कार्यकर्ते आणि मतदारांचे शेट यांनी आभार मानले.

शंकर चोडणकर, दयानंद कारबोटकर, विश्वास चोडणकर, श्रुती जल्मी, सरपंच रवींद्र किनळकर, संदेश पार्सेकर, मोहिनी जल्मी, प्रियंमवदा गावकर, उपसरपंच सुफला चोपडेकर उपस्थित होते.

Mayem Constituency
Goa News: गोवा काँग्रेसचा 2027 साठी 'अबकी बार 30 पार'चा नारा, निरंकाल-दाभाळ येथे आढळली मगर; ठळक घडामोडी

भाजपसाठी सुरक्षित

विरोधी काँग्रेससह मये मतदारसंघातून गत विधानसभा निवडणूक लढवलेले गोवा फॉरवर्ड, आरजीपी आणि आप या पक्षांचे उमेदवार भाजप विरोधात एकत्र आले होते. मात्र प्रचारासाठी भाजप विरोधात मुद्दाच नसल्याने विरोधक निष्प्रभ ठरले. सुजाण मतदार विरोधकांना बळी पडले नाहीत. उलट भाजपला मतदान करुन मये मतदारसंघ हा भाजपसाठी सुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवले आहे, असे प्रेमेंद्र शेट म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com