Goa Lok Sabha Election| लोकसभेसाठी भाजपची आतापासूनच रणनीती; नारायण राणे

द. गोव्‍यासाठी फिल्‍डिंग
Narayan Rane
Narayan Rane Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे भाजपने दक्षिण गोव्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यांनी आज या मतदारसंघाचा आढावा घेत हा लोकसभा मतदारसंघ जिंकणारच असा विश्वास व्यक्त केला. पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री राणे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर उपस्थित होते.

(BJP's strategy for Lok Sabha from now says Narayan Rane)

Narayan Rane
Goa Petrol Price|जाणून घ्या, गोव्यातील एक लिटर पेट्रोल आणि डिझेलचे दर

भाजपने 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून देशातील 70 केंद्रीय मंत्र्यांना प्रत्येकी दोन या पद्धतीने देशातील 140 मतदारसंघांची जबाबदारी देऊन त्या त्या मतदारसंघात पाठविण्यात आले आहे. हे 140 ही मतदारसंघ 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला जिंकता आले नव्हते. म्हणून या मतदारसंघाची विशेष तयारी करणे सुरू केले आहे.

मंत्री राणे म्हणाले, 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने 303 जागा जिंकल्या होत्या. आता हे टार्गेट वाढवून 403 करण्यात आले आहे. त्या निवडणुकीमध्ये भाजपने ज्या 140 जागा गमावल्या होत्या, त्या 140 जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यापैकी शंभर जागा जिंकण्याचा भाजपचा इरादा आहे. म्हणून या पराभूत झालेल्या 140 जागांची जबाबदारी केंद्रातील प्रत्येक मंत्र्यांना दोन या पद्धतीने देण्यात आली आहे. माझ्याकडे दक्षिण गोव्याबरोबरच दक्षिण मुंबईची जबाबदारी सोपविली असून या दोन्ही जागा भाजप जिंकेल असा मला विश्वास आहे.

Narayan Rane
Goa Monsoon| बरसात सुरूच! 14 सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता, पाऊस शंभरीच्या उंबरठ्यावर

आम्ही ग्रामपंचायत ते जिल्हा पंचायत गटापर्यंत केंद्र सरकारने केलेली विकासकामे घेऊन जाणार असून त्या आधारेच आम्ही मते मागणार आहोत. शिवाय राज्यात डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आहे, ते उत्तम काम करत असून त्याचा फायदाही लोकसभेची जागा जिंकण्यासाठी आम्हाला होईल, असा विश्वास राणे यांनी व्‍यक्त केला.

200 कोटींचे एमएसएमई सेंटर

केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याच्या वतीने राज्यात उद्योजकांना प्रशिक्षण देणारे 200 कोटी रुपये खर्चून एमएसएमई सेंटर उभारण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव पाठवण्यास राज्य सरकारला सांगण्यात आला आहे. हे केंद्र झाल्यावर राज्यातील युवकांना उद्योगाची प्रेरणा मिळेल आणि प्रशिक्षणही, असे केंद्रीय मंत्री राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com