Waqf Amendment Act 2025: गोव्यात पोर्तुगीजकालीन समान नागरी कायदा, आता गरज वक्फ कायद्याच्या जागरुकतेची, भाजप नेत्याचं वक्तव्य

UCC in Goa Radhamohandas on Waqf Law Amendment: गोव्यात पोर्तुगीजकालीन समान नागरी कायदा असताना असलेल्या मुस्लिमांचा प्रश्न नाही. गेल्या १० वर्षात राज्याबाहेरून येथे येऊन राहणाऱ्यांची संख्या वाढली की समस्या म्हणजे काय ते समजेल.
UCC in Goa Radhamohandas on Waqf Law Amendment
Radhamohandas Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात पोर्तुगीजकालीन समान नागरी कायदा असताना असलेल्या मुस्लिमांचा प्रश्न नाही. गेल्या १० वर्षात राज्याबाहेरून येथे येऊन राहणाऱ्यांची संख्या वाढली की समस्या म्हणजे काय ते समजेल. त्यासाठी वक्फ कायदा दुरुस्तीचे ज्ञान मदतीला येईल, असे भाजपचे राष्ट्रीय सचिव राधामोहनदास अग्रवाल यांनी मंगळवारी (15 एप्रिल) पत्रकार परिषदेत सांगितले.

ते म्हणाले, गोव्यात (Goa) मुस्लिमांची संख्या वाढली, की गोमंतकीयांना काय ते समजेल. त्यासाठी गोमंतकीयांना या विषयाची माहिती देणे आवश्यक आहे. भाजपने ‘वक्फ सुधारणा का’, याची माहिती देणारी पत्रके तयार केली आहेत. त्याचे वाटप राज्यभरात केले जाईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर राज्यात वक्फ मंडळ आणि वफ्क मालमत्ता नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे राज्यात या सुधारणांची माहिती का, अशी विचारणा अग्रवाल यांना केली असता त्यांनी वरीलप्रमाणे निवेदन केले.

UCC in Goa Radhamohandas on Waqf Law Amendment
PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

ते म्हणाले, कॉंग्रेसच्या (Congress) काळात २००६ मध्ये सच्चर समितीने अहवाल दिला होता. त्यात मुस्लिमांच्या आर्थिक व सामाजिक स्तराविषयी चिंताजनक अशी माहिती दिली होती. असे असतानाही त्यात सुधारणा करण्यासाठी कॉंग्रेसने काही केले नाही. त्यामुळे वक्फ मालमत्ता असूनही मुस्लिमांना त्याचा उपयोग होत नाही हे दिसून आल्याने त्याच्या कामकाजात सुधारणा करून गरीब मुस्लीमांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असेही अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com