''आगामी लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागा भाजप जिंकेल''

गोवा सरकारने सलग तिसऱ्यांदा नवा इतिहास रचला - सदानंद शेठ तानावडे
Goa BJP
Goa BJPDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: आगामी लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागा जिंकून भाजप 324 चा आकडा पार करेल असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची 8 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रेल्वे कम्युनिटी हॉल वास्को येथे भाजप वास्को मंडळाने आयोजित केलेल्या गरीब कल्याण संमेलन महासभेत ते बोलत होते. ( BJP will win the upcoming Lok Sabha elections - Sadanand Sheth Tanawade )

मोदी सरकारला आठ वर्षे झाल्याने सेवा, सुशासन, गरीब कल्याण अंतर्गत येथे भाजपा वास्को मंडळातर्फे कार्यकर्त्यांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी तानावडे, मंत्री माविन गुदिन्हो, आमदार साळकर यांच्यासह वास्को भाजपा मंडळ अध्यक्ष दीपक नाईक, बायणा रवींद्र भवनाचे अध्यक्ष जयंत जाधव, नगरसेविका शमी साळकर, व इतर व्यासपीठावर होते.

Goa BJP
आमदारांनी घेतली साळ नदीच्या संरक्षणाची शपथ

तानावडे पुढे म्हणाले की,पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांच्या नेतृत्वाखाली शहरी गरीब संकल्पने अंतर्गत राज्यभर विविध कार्यक्रम राबवले जातील आणि केंद्र सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोचतील. मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की भाजप उत्तर आणि दक्षिण गोव्यातील दोन्ही खासदारांच्या जागा मोठ्या फरकाने जिंकेल. कारण गोवा वासियांनी आम्हाला जिल्हा पंचायत निवडणुका, नागरी निवडणुका आणि अगदी अलीकडच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जनादेश दिला आहे.

Goa BJP
ताळगाव खंडणी प्रकरणाला लागले वेगळे वळण

भाजप सत्तेत परतणार नाही हे दाखवून देणारे अनेक सुर होते, पण आम्हाला 22 जागांवर विश्वास होता. आम्ही दोन जागा अगदी नगण्य फरकाने गमावल्या असल्या तरी लोकांच्या प्रेमाने आम्ही 20 जागा जिंकून आम्ही भाजपची स्थापना केली. गोव्यातील सरकारने सलग तिसऱ्यांदा नवा इतिहास आणि नवा विक्रम रचला आहे. जोपर्यंत लोक आमच्या सोबत आहेत तो पर्यंत आम्हाला कसलीच भीती नाही. मोदी सरकार हे सर्वाधिक लोकप्रिय आणि आदरणीय आहे याची मी खात्री देऊ शकतो.

गेल्या वेळी 303 जागांवर विजय मिळवला होता. यावेळी भाजप 324 चा आकडा नक्कीच पार करेल असे तानावडे यांनी सांगितले. तानावडे यांनी खासदार निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार कोण असू शकतात, यावर भाष्य करण्यास नकार दिला. कोविड काळात सर्व देश आर्थिक मंदी आणि आर्थिक मंदीच्या सावटाखाली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सारख्या उत्कृष्ट नेत्याने देशाचा धुरा सांभाळा असे तानावडे शेवटी म्हणाले. केंद्राच्या योजना खूप आहेत, त्या लोकांपर्यंत पोहचून त्यांचा लाभ त्यांना मिळावा यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे साळकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com