10 वर्षांच्या कामाच्या जोरावर भाजप जिंकेल; सीएम सावंत

गोवा हे देशातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक, राज्याच्या अर्थव्यवस्थेतही त्याचा मोठा वाटा
Pramod Sawant
Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

देशातील सर्वात लहान राज्य असलेल्या गोव्यातील 40 जागांसाठी आज मतदान होत आहे. राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन तासांत म्हणजे सकाळी 9 वाजेपर्यंत गोव्यात 11.04 टक्के मतदान झाले. सकाळी 11 पर्यंत हा आकडा 26.63% पर्यंत वाढला. त्याच वेळी, दुपारी 1 पर्यंत, हा आकडा 44.63% पर्यंत वाढला.

सीएम सावंत म्हणाले - 10 वर्षांच्या कामाच्या जोरावर भाजप जिंकेल

मतदान सुरू झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) म्हणाले की, मतदान सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान (PM) मोदींनी त्यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. गेल्या 10 वर्षांच्या कामगिरीच्या जोरावर राज्यात भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार असल्याचे ते म्हणाले. सावंत यांनीही 100 टक्के बहुमताचा दावा केला.

Pramod Sawant
'आमच्या भावाने बलिदान दिले, भाजपने दाद दिली नाही'

गोव्याला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून ओळखले जाते.

गेल्या दोन वेळा राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला गोवा (goa) कोणत्याही परिस्थितीत हातातून जाऊ द्यायचा नाही. समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या या राज्याला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणतात, कारण इथे एक बंदर आहे, ज्यातून लाखो-करोडो रुपयांचा व्यवसाय होतो. बड्या उद्योगपतींनी येथे मोठी गुंतवणूक केली आहे. गोवा हे देशातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेतही त्याचा मोठा वाटा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com