Goa Congress: भाजपकडून ‘हिंदू कार्ड’चा वापर केवळ निवडणुकीसाठी; कवठणकर यांचा आरोप

Sunil Kavthankar: राहुल गांधींचे भाषण नीट ऐकण्याचा सल्ला
Sunil Kavthankar: राहुल गांधींचे भाषण नीट ऐकण्याचा सल्ला
Goa Pradesh Congress Committee Vice President Sunil KavthankarDainik Gomantak
Published on
Updated on

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपचे खोटे हिंदू प्रेम सर्व जनतेसमोर आणले आहे. आगरवाड्यातील हिंदूचे घर पाडले, सिध्दी नाईकचा खून झाला, टॅक्सीधारकांचा निर्माण झालेला प्रश्‍न यावर राज्यातील कथित हिंदू संघटना कुठे होत्या? भाजप केवळ ‘हिंदू कार्ड’चा वापर निवडणुकीसाठी करीत आल्याचे यातून सिद्ध झाले आहे, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी केला.

काँग्रेस भवनात सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेस ॲड. जितेंद्र गावकर, प्रदेश युवा काँग्रेसचे अध्यक्ष ज्योएल आंद्रादे यांची उपस्थिती होती.

कवठणकर म्हणाले, राहुल गांधी यांनी लोकसभेत जे भाषण केले आहे, त्याचा भाजपचे लोक वेगळाच अर्थ काढीत आहेत. खरे तर त्यांनी अगोदर राहुल गांधी यांचे संपूर्ण भाषण ऐकायला हवे, हिंदू कधीही हिंसा पसरवत नाही, असे स्पष्ट म्हटले आहे.

भाजप हा हिंसा पसरवत असल्याचा त्यांचा आरोप आहे. भाजप हा राजकारणासाठी ‘हिंदू कार्ड’चा वापर करीत आला असल्याचे राहुल गांधी यांनी सांगून भाजपला उघडे पाडले आहे. हिंदूंचा केवळ वापर केल्यामुळेच हिंदू मतदारांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला नाकारले आहे, हे स्पष्ट आहे.

राज्यातील भाजपचे हिंदू प्रेम हे बार परवान्यांसाठी दुप्पट पैसे घेण्याच्या आदेशातून दिसून आले आहे, असाही टोला सुनील कवठणकर यांनी लगावला. त्याचबरोबर भाजपच्या नेत्यांनी काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढण्यापूर्वी राहुल गांधी काय म्हणाले हे पाहायला हवे होते, असेही ते म्हणाले. याप्रसंगी ॲड. गावकर व आंद्रादे यांनीही आपली मते मांडली.

Sunil Kavthankar: राहुल गांधींचे भाषण नीट ऐकण्याचा सल्ला
Goa Congress: सरकारी वास्तूंचे स्ट्रक्चरल ऑडिट करा! पाटकर यांचा इशारा

...तेव्हा हिंदू संघटना कोठे होत्या?

हिंदू धर्माचा टेंबा मिरविणाऱ्या विविध संघटनांच्या भूमिकेवरही कवठकणर यांनी जोरदार टीकास्र सोडले. आगरवाड्यात हिंदूचे घर पाडले, यापूर्वी सिद्धी नाईक या युवतीचा खून झाला, टॅक्सीवाल्यांचा प्रश्‍न समोर आला तेव्हा या हिंदू संघटना कुठे होत्या? त्यांनी आवाज का उठविला नाही असा सवाल सुनील कवठणकर यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com