भाजप एसटी मोर्चातर्फे गोव्यातील पाच तालुक्यात ‘आदिवासी कल्याण’

क्रीडामंत्री गावडे: सामाजिक एकोप्याचा प्रयत्न
मंत्री गोविंद गावडे यांना पुष्पगुच्छ देताना अँथनी बार्बोज. बाजूस प्रभाकर गावकर व मान्यवर.
मंत्री गोविंद गावडे यांना पुष्पगुच्छ देताना अँथनी बार्बोज. बाजूस प्रभाकर गावकर व मान्यवर.Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: सामाजिक न्याय पखवडा मोहिमेअंतर्गत भाजपच्या एसटी मोर्चाच्यावतीने राज्यातील पाच तालुक्यात आदिवासी कल्याण उत्सव आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक एकोपा वाढीस लागावा यासाठी हा उत्सव घेण्यात येणार आहे, अशी माहिती कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी दिली.

सांगे, केपे, काणकोण व धारबांदोडा या चार तालुक्यांत 15 एप्रिल रोजी, तर सासष्टी तालुक्यात 18 एप्रिल रोजी या उत्सवाचे आयोजन होणार आहे.

मंत्री गोविंद गावडे यांना पुष्पगुच्छ देताना अँथनी बार्बोज. बाजूस प्रभाकर गावकर व मान्यवर.
द. गोवा जिल्हा इस्पितळाच्या, पार्किंग समस्येवर काढला तोडगा

या उत्सवाची रूपरेषा आखण्यासाठी आज मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री गावडे यांची भेट घेतली. यात अध्यक्ष गावकर यांच्या बरोबर उपाध्यक्ष अँथनी बार्बोज, सरचिटणीस मोहन गावडे, मीनानाथ गावडे व सुभाष गावडे यांचा समावेश होता. त्यानंतर सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांचीही त्यांनी भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती गावकर यांनी दिली.15 एप्रिल रोजी गुड फ्रायडे असल्याने सासष्टीचा मेळावा 18 रोजी होणार असून, यानिमित्त राय मनोरा येथील मैदानावर संगीत रजनीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अँथनी बार्बोज यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com