"गोव्यात गॅस-इंधनचे दर कमी करण्यासाठी भाजपने उपाययोजना कराव्यात"

भाजपच्या महिला मोर्चाच्या सदस्यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी मुख्यमंत्र्याना राखी बांधावी व गॅस सिलंडर व पेट्रोलचे दर कमी करुन सर्व महिलांना रक्षबंधनाची भेट देण्याची मागणी करावी.
गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष बीना नाईक
गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष बीना नाईकDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गॅस सिलींडरवरील अनुदान बंद केल्यामुळे प्रत्येक कुटुंबाच्या खात्यात येणारे 4,200 रुपये बंद झाले आहेत. घरगुती गॅस सिलेंडर 25 रुपायानी वाढल्याने तसेच पेट्रोल व डिझेलचे दर भरमसाठ वाढल्यामुळे कोरोनाच्या संकटात होरपळून निघालेल्या सर्वसामान्य लोकांना बरेच त्रासदायक होत असून हे दर त्वरीत कमी करावेत. मुख्यमंत्र्यानी गोव्यात गॅस व इंधनचे दर कमी करण्यासाठी खास उपाय योजावेत. अशी मागणी गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष बीना नाईक यांनी कले.

पणजी येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत नाईक बोलत होत्या. यावेळी पणजी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष मुक्तमाला फोंडवेकर, तसेच फेर्नांडो कुलासो व सांन्ड्रा फर्नांडिस उपस्थित होत्या. भाजपचे सरकार निवडणुकीपुर्वी महागाई कमी करण्याचे आश्‍वासने देते आणि निवडून आल्यानंतर महागाई वाढवते. राज्यात व केंद्रात सत्तवेर असलेले भाजपचे सरकार खोटारडे आहे. भाजपचे सरकार सर्वमान्यांवर अन्याय करत आहे. अशी टीका यावेळी नाईक यांनी केली.

गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष बीना नाईक
Goa Crime: तो गोव्यात कामासाठी आला अन्‌...

भाजपच्या महिला मोर्चाच्या सदस्यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी मुख्यमंत्र्याना राखी बांधावी व गॅस सिलंडर व पेट्रोलचे दर कमी करुन राज्यातील सर्व महिलांना रक्षबंधनाची भेट देण्याची मागणी करावी. अशी सुचना यावेळी फोंडवेकर यांनी केली. जिवनावश्‍यक वस्तूंचे दर त्वरीत कमी करण्याची मागणी फर्नांडिस यांनीही यावेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com