कुर्टी-खांडेपार पंचायतीवर भाजपचे राज्य

निवडणूक बिनविरोध न झाल्यामुळे प्रक्रियेला गालबोट: पंचांची आता निवडणुकीवर ‘नजर’
BJP
BJPDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: फोंडा मतदारसंघातील एकमेव कुर्टी-खांडेपारच्या सरपंच व उपसरपंचपदी दादी नाईक आणि सुनील खेडेकर यांची निवड झाली. दोघेही भाजपचे असल्यामुळे आता ही पंचायत खऱ्या अर्थाने भाजपच्या ताब्यात आली आहे.

मागे दादी नाईक हे एक वर्षाकरिता सरपंच होते; पण त्यावेळी ते कॉंग्रेसमध्ये होते. रवी नाईक पुत्र रितेश आणि रॉय यांच्यासोबत दादींनी भाजपप्रवेश केला होता.

उपसरपंच सुनील खेडेकर हेही सरपंचपदी होते. ते मूळचे भाजपचे आहेत. आता यावेळी त्यांना उपसरपंच पदावर समाधान मानावे लागत आहे. सध्या जरी या पंचायतीवर भाजपचे राज्य असले तरी येत्या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारेल, हे सांगणे कठीण आहे. एकंदरीत ही निवडणूक म्हणजे उमेदवारांबरोबरच नेत्यांचा प्रतिष्ठेचा प्रश्‍न बनणार असून यातून नेमके काय हाताला लागते, याचे उत्तर आणखी दीड महिन्याननंतरच मिळेल.

BJP
साळगावात नाट्यकलाकारांचा सन्मान

मगोपने दाखवली चुणूक

वास्तविक आता पंचायत निवडणुकीला फक्त दीड महिना राहिला असल्यामुळे या सरपंच-उपसरपंच पदाला विशेष अर्थ राहिलेला नाही. तरीसुध्दा लढत चुरशीची झाली. फोंडा पालिकेत तटस्थ राहिलेल्या मगोपने यावेळी थोडा हात दाखवलाच. त्यांचा पराभव झाला असला तरी आम्ही सुध्दा मैदानात आहोत, हे त्यांनी सप्रमाण दाखविले. हा पुढील निवडणुकीचा ‘ट्रेलर’ समजला जातो. पुढील निवडणूक अटीतटीची होण्याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत.

BJP
डिचोलीत लाईनमनांसह 160 कर्मचाऱ्यांचा गौरव

आगामी निवडणूक चुरशीची

जरी यावेळी सरपंच व उपसरपंच हे दोघेही भाजपचे असले तरी पुढील निवडणुकीत काय होईल हे सांगणे कठीण आहे. कुर्टी-खांडेपार पंचायतीत आता अनेक इच्छुक उमेदवार असून त्यामुळे मतविभागणी होणे अपरिहार्य आहे. या मतविभागणीमुळे कोणीही थोड्या फार फरकाने निवडून येऊ शकतो. आधीच पंचायतीतल्या प्रभागांतील मतदारसंख्या कमी असल्यामुळे पाच-दहा मतांचा फरकसुध्दा एखाद्याला विजयाकडे नेऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com