साळगावात नाट्यकलाकारांचा सन्मान

योगदानाची दखल: आदर्श संगीत विद्यालयातर्फे कार्यक्रमाचे आयोजन
Drama
Drama Dainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: साळगाव येथील सरकारी शाळेच्या आवारात आदर्श संगीत विद्यालयाने कला आणि संस्कृती खात्याच्या सहकार्याने घेतलेल्या पहिल्या संगीत संमेलनात स्थानिक नाट्यकलाकारांचा सत्कार करण्यात आला. स्वत:च्या अभिनयाने राज्यभरात नाव कमवलेले तसेच दूरचित्रवाणीवरील ‘लोकशाय हाय हाय’ या बहुचर्चित कार्यक्रमाने समाजात जागृती करणारे बहुआयामी कलाकार प्रदीप पाडगावकर व आनंद मोरजकर यांचा सुप्रसिद्ध नाट्यकर्मी, लेखक व दिग्दर्शक राजीव शिंदे यांच्या हस्ते जाहीर सत्कार या वेळी झाला.

Drama
डिचोलीत लाईनमनांसह 160 कर्मचाऱ्यांचा गौरव

विद्यालयाचे सचिव भानुदास शिरोडकर यावेळी म्हणाले, कित्येक दशके संगीत, कला, संस्कृतीचा वारसा जपत आलेल्या साळगावातील कलाकारांना विशेष मानसन्मान मिळत असतो. पण, काही वेळा अनावधानाने गुणी कलाकारांचे योगदान विसरले जाते. प्रदीप पाडगावकर व आनंद मोरजकर या कलाकारांचे साळगावच्या विविध क्षेत्रांत फार मोठे योगदान आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com