Nilesh Cabral: नीलेश काब्राल यांच्यावर राजीनाम्याची वेळ! कर्मचारी भरती घोटाळा भोवला

भाजप पक्षश्रेष्ठींकडून आमदारांच्या तक्रारींची दखल
Nilesh Cabral Latest News | Goa Political News
Nilesh Cabral Latest News | Goa Political NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Nilesh Cabral Latest News: सार्वनजिक बांधकाम खात्यातील कर्मचारी भरती घोटाळ्याची माहिती दिल्लीत पोचल्यानंतर राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत. भाजप पक्षश्रेष्ठींनी सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे काब्राल यांच्याकडून कधीही राजीनामा घेतला जाऊ शकतो.

Nilesh Cabral Latest News | Goa Political News
Goa Daily News Wrap: गोव्यात पर्यटकांची लूट सुरूच; नीलेश काब्राल यांच्यावर राजीनाम्याची वेळ! राज्यातील दिवसभरातील महत्वाच्या बातम्या

आमदारांनी शिफारस केलेल्या उमदेवारांना डावलून काब्राल यांनी आपल्या मर्जीतील उमेदवारांची निवड कनिष्ठ अभियंता, तांत्रिक सहायक पदासाठी केल्याचा आरोप केला जात आहे. यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय खुद्द सत्ताधारी आमदारांकडूनच पक्षश्रेष्ठींकडे लेखी स्वरूपात व्यक्त करण्यात आल्यानंतर त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

सध्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपचे वरिष्ठ नेते व्यस्त असल्याने त्यांच्याकडे या गोष्टीकडे तपशीलाने बघण्यास वेळ नाही. त्यामुळे काब्राल यांचा राजीनामा घेऊन विषय संपवा असे सांगण्यात आले आहे.काब्राल यांच्याशी पक्षाच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचेही याबाबत बोलणे झाले आहे.

काब्राल यांची आवराआवर

आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटलो त्यांनी माझा राजीनामा मागितलेला नाही असे सांगण्याचा काब्राल प्रयत्न करत असले, तरी त्यांनी कार्यालयात आवराआवर करण्यास सुरवात केल्याची माहिती मिळाली आहे. आपल्याला आज ना उद्या राजीनामा द्यावा लागेल याची कल्पना आल्यानेच महत्त्वाच्या फाईल्स हातावेगळ्या करण्यासाठी त्यांनी सुरवात केली आहे.

आणखी दोन मंत्र्यांचाही राजीनामा घेणार?

दिल्लीत हा विषय पोचल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यामुळे सत्ताधारी वर्तुळातील अनेकजण याविषयी उघडपणे बोलण्यास तयार नाहीत. काब्राल यांचा एकट्याचाच राजीनामा घेणार की आणखीन दोन मंत्र्यांचा अशी नवी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

कुडचडेत ‘कही खुशी कही गम’

कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांना मंत्रिपदावरून खाली उतरण्याचे आदेश पक्षश्रेठींनी दिल्याचे वृत्त आज दुपारी समाज माध्यमावरून झळकताच कुडचडे मतदारसंघात लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या वृत्तामुळे कुडचडेत ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती निर्माण झाली असून लोक उघडपणे काहीच बोलताना दिसत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com