Goa BJP : सुमारे 1100 कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशामुळे डिचोलीत आता या पक्षाची ताकद पुन्हा एकदा वाढली आहे. त्यामुळे या पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नवा हुरूप आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनीही डिचोलीत भाजपची ताकद वाढल्याची पावती दिली आहे.
कालच्या पक्षप्रवेश सोहळ्याला मिळालेला प्रतिसाद पाहता, डिचोलीतील भाजपची धुरा आता अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या खांद्यावर आली आहे.
भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखण्यात येणाऱ्या डिचोली मतदारसंघात गतसाली झालेल्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाची मोठी पीछेहाट झाली होती. विजय सोडाच भाजपची तिसऱ्या स्थानी घसरण झाली होती. त्यामुळे भाजपच्या गोटात चिंता पसरली होती. हा पराभव लाजिरवाणा होता. त्यानंतर डिचोलीतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये काहीसी मरगळ आली होती. मात्र डिचोलीचे अपक्ष आमदार डॉ.
चंद्रकांत शेट्ये यांचे बंधू तथा माजी जिल्हा पंचायत सदस्य संजय (शरद) शेट्ये यांनी काल शुक्रवारी आपल्या 1100 कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
या कार्यकर्त्यांमध्ये अपक्ष आमदार डॉ. शेट्ये यांचे वर्चस्व असलेल्या पंचायतींच्या सरपंच, पंचसदस्यांचा समावेश आहे. या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप नेत्यांसमवेत डिचोलीचे माजी आमदार तथा माजी सभापती राजेश पाटणेकर यांच्यासह भाजप मंडळ, महिला मोर्चा, किसान मोर्चा, युवा मोर्चा पदाधिकारी तसेच नगरसेवक उपस्थित होते.
मतदारसंघात भाजपचेच वर्चस्व
गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत डिचोली तालुका भाजपच्याच बाजूने राहिलेला आहे. या तालुक्यात भाजपचेच वर्चस्व राहिलेले आहे. आता सुमारे ११०० कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे डिचोलीत भाजपची ताकद वाढली आहे, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.