

BJP President Nitin Nabin Video: गोव्याच्या राजकीय मैदानात सध्या आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असून, भारतीय जनता पक्षाने आपल्या प्रचाराची आणि संघटन मजबुतीची मोठी तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हे सध्या दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर असून, त्यांच्या आगमनाने गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा भाजप कार्यालयात नितीन नवीन यांचे आगमन झाले, तेव्हा त्यांनी गोव्याच्या संस्कृतीचा आदर करत स्वतः ढोल-ताशा वाजवला. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून एका राष्ट्रीय अध्यक्षाचा हा 'देसी' अंदाज चर्चेत आहे.
नितीन नवीन यांचा हा दौरा केवळ औपचारिक नसून, 2027 च्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती निश्चित करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. म्हापसा येथील कार्यालयात झालेल्या जंगी स्वागतानंतर नवीन यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांना 'बूथ पातळीवर' पक्ष मजबूत करण्याचा संदेश दिला. ढोल-ताशांच्या गजरात स्वतः सामील होऊन त्यांनी कार्यकर्त्यांना हेच दाखवून दिले की, पक्ष नेतृत्व ग्राऊंड लेव्हलच्या कार्यकर्त्यांसोबत आणि स्थानिक संस्कृतीसोबत पूर्णपणे जोडलेले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी नितीन नवीन यांच्या या दौऱ्याबद्दल समाधान व्यक्त केले. दुसरीकडे, विरोधकांच्या वाढत्या हालचालींना उत्तर देण्यासाठी आणि सरकारच्या विकासकामांचा प्रचार करण्यासाठी भाजप आता अधिक आक्रमक होणार असल्याचे या दौऱ्यातून स्पष्ट झाले आहे. नवीन यांचा हा उत्साह आणि कार्यकर्त्यांशी साधलेला संवाद गोव्यातील राजकीय समीकरणे भाजपच्या (BJP) बाजूने वळवण्यासाठी निर्णायक ठरु शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.