'भाजपने अगोदर स्वतःला पूर्णवेळ पक्ष असल्याचे सिद्ध करावे'

राजकीय पक्षांना “अर्धवेळ” म्हणण्याआधी आपला पक्ष पूर्णवेळ असल्याचे सिद्ध करावे, असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्या राखी प्रभुदेसाई नाईक (Rakhi Prabhudesai Naik) यांनी केले.
Rakhi Prabhudesai Naik

Rakhi Prabhudesai Naik

Dainik Gomantak 

Published on
Updated on

पणजी: महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे अपयशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रथम हे सत्य स्वीकारले पाहिजे की त्यांचा पक्ष गोव्यामध्ये (Goa) स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यात अपयशी ठरला आहे, ज्यामुळे इतर राजकीय पक्षांना “अर्धवेळ” म्हणण्याआधी आपला पक्ष पूर्णवेळ असल्याचे सिद्ध करावे, असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्या राखी प्रभुदेसाई नाईक (Rakhi Prabhudesai Naik) यांनी केले. भाजप गेल्या दहा वर्षांपासून स्वतःचे नेते निर्माण करण्यात अपयशी ठरल्याने भाजप (BJP) आता गैर-भाजप विचारसरणीच्या चेहऱ्यांवर अवलंबून आहे. इतर पक्षांमधून भाजप आता नेत्यांची आयात करत असल्याचे नाईक यांनी नमूद केले.

दरम्यान, फडणवीस यांनी प्रथम हे सत्य लक्षात घेतले पाहिजे की, ते ज्यांना अर्धवेळ पक्ष संबोधत आहेत, त्या पक्षांनीच त्यांची सत्ता उलटवून लावली आहे आणि 'मी पुन्हा येईन'म्हणणारे फक्त विरोधी पक्षनेतेपद सांभाळत आहेत. फडणवीसांनी शांतपणे बसून विचार केला पाहिजे की गोव्यामध्ये त्यांचा पक्ष अल्पमतांमध्ये असतानादेखील अनैसर्गिकपणे त्यांनी आमदार कुठून आणले? असा प्रश्नदेखील नाईक यांनी यावेळी विचारला.

<div class="paragraphs"><p>Rakhi Prabhudesai Naik</p></div>
कॉंग्रेस म्हणजे 'पार्टटाईम पार्टी', देवेंद्र फडणवीसांची टीका

नाईक पुढे म्हणाल्या, भाजप एखाद्या बांडगुळाप्रमाणे आपल्या अस्तित्वासाठी इतर पक्षांवर अवलंबून आहे. आता निवडणुका जवळ आल्या असतानाही, त्यांच्याकडे स्वतःचे नेते नाहीत आणि पुढच्या निवडणुकांनंतर आमदारांची संख्या एक आकडी होण्याच्या भीतीने ते नवे चेहरे आयात करत आहेत.

तसेच, भाजपला पक्ष म्हणून मान्यता रद्द केली पाहिजे कारण त्याला स्वतःचा कोणताही आधार नाही, तर तो आयात केलेल्या नेत्यांवर अवलंबून आहे. 'भाजपकडून पैशाच्या पिशव्या काढून घेतल्या तर, त्याच्याकडे देण्यासारखे काही नाही,' सेक्स स्कँडल कलंकित मंत्री मिलिंद नाईक (Milind Naik) यांचा खोटा निषेध केल्यानंतर फडणवीस महिलांच्या मेळाव्याला कोणत्या तोंडाने संबोधित करतात, अशीहि विचारणा यावेळी नाईक यांनी केली. "सेक्स, टॅक्स आणि जॉब घोटाळ्यांनी पक्षाचे तुकडे तुकडे केले आहेत आणि तरीही फडणवीस ओढून ताणून आपला धाडसी चेहरा दाखवत आहेत, कारण त्यांच्यवर गोव्याचे काम सोपवण्यात आले आहे,"

शिवाय, भाजप अस्तित्वात येण्याआधीपासूनच काँग्रेस (Congress) सार्वजनिक जीवनात आली आहे आणि लोकांच्या मनावर राज्य करत आहे. "फडणवीसांनी हे विसरता कामा नये की, हा तोच तथाकथित अर्धवेळ पक्ष आहे, ज्याने 2017 मध्ये बहुमताच्या जागा जिंकल्या होत्या. हाच पक्ष येत्या निवडणुकीत भाजपच्या पायाखालचा गालिचा काढेल." असा विश्वास यावेळी राखी नाईक यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com