Michael Lobo: गोव्यात Traffic Police कडून पर्यटकांचा छळ सुरुच, मुख्यमंत्र्यांचा आश्वासनाचा काहीच फायदा झाला नाही; मायकल लोबोंचा सरकारला घरचा आहेर

Michael Lobo on Goa Government: भाजपचे आमदार असून देखील मायकल लोबोंचे सरकारवर टीकास्त्र
Michael Lobo on Goa Government: भाजपचे आमदार असून देखील मायकल लोबोंचे सरकारवर टीकास्त्र
Michael Lobo Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सध्या राज्यात अपघातांच्या प्रमाणात चिंताजनक वाढ होतेय. राज्यात वाहतुकीला मार्ग दाखवणारे आवश्यक फलक नाहीत, तसेच विविध ठिकाणी रस्त्यांवर सर्वत्र खड्डे तयार झाले आहेत आणि या गंभीर परिस्थितीमुळे राज्यातून दरदिवशी अपघातांच्या बातम्या समोर येत आहेत.

या आणि अशा अनेक घटकांमुळे लोकं जीव गमावत आहेत असं म्हणत आज पुन्हा एकदा मायकल लोबो यांनी गोवा सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे केले. मायकल लोबो यांच्या मते राज्यात पाऊस जास्त पडला म्हणून रस्ते खराब झाले असं म्हणत सरकार काढता पाय घेऊ शकत नाही.

आज DGPची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना भाजपचे आमदार मायकल लोबो यांनी थेट सरकारवरच वार केला. राज्यात ट्राफीक पोलिसांकडून पर्यटकांचा छळ सुरु असल्याचं ते म्हणालेत. या विषयी प्रश्न उभारताच मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आश्वासन दिले होते मात्र त्याचा काहीच फायदा झालेला नाही.

Michael Lobo on Goa Government: भाजपचे आमदार असून देखील मायकल लोबोंचे सरकारवर टीकास्त्र
परशुरामाच्या रुपाची माटोळी सजावट अव्वल, देखावा स्‍पर्धेत ब्रह्मेश्‍वर युवक संघ प्रथम; वाचा दोन्ही निकाल सविस्तर

हॅल्मेट, गाडीची सर्व कागदपत्रे असूनही पर्यटकांना उगाच 15 मिनीटे ताटकळत रहावे लागते. पर्यटन मंत्री राज्यात पर्यटक यावेत म्हणून प्रयत्न करत आहेत मात्र ह्या छळवणूकीमुळे राज्यात पर्यटकांची संख्या घटतेय असे म्हणत मायकल लोबो यांनी सरकारवर थेट आरोप केला.

राज्यात वीज आणि पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात सुरु आहे. दररोजच्या समस्येला स्थानिक कंटाळले असून ते वेळोवेळी संताप व्यक्त करतायत आणि असे असताना भूतानी सारखे मोठे प्रकल्प गोव्यात सुरु न करणेच योग्य ठरेल.

असे प्रकल्प आल्यास गावांचा आणि शहरांचा नक्षाच बदलेल. "मी टीसीपी मंत्री विश्वजीत राणेंची भेट घेऊन यावर माझे मत मांडणार आहे" असे लोबो म्हणालेत. भाजपचे आमदार असून देखील मायकल लोबो यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीकास्त्र सोडल्याने सर्वत्र हा चर्चेचा विषय ठरतोय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com