मुरगावात विद्यमान आमदारांच्या विधानावर भाजप नेत्यांची टीका

जनता दहशतीखाली राहत आहे, असे विधान करून स्वतःची खिल्ली उडवणारा विद्यमान आमदार मुरगावात अपघाती आमदार बनला असल्याची माहिती मुरगाव भाजप मंडळातर्फे देण्यात आली आहे.
मुरगावात विद्यमान आमदारांच्या विधानावर भाजप नेत्यांची टीका
मुरगावात विद्यमान आमदारांच्या विधानावर भाजप नेत्यांची टीकाDainik Gomantak

सध्या मुरगावात पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. जनता दहशतीखाली राहत आहे, असे विधान करून स्वतःची खिल्ली उडवणारा विद्यमान आमदार मुरगावात अपघाती आमदार बनला असल्याची माहिती मुरगाव भाजप मंडळातर्फे देण्यात आली आहे. मुरगावात मिठाई वाटून विद्यमान आमदार आपला विजय साजरा करीत असला तरी माजी आमदार मिलिंद नाईक यांने प्रत्येक घरात नोकऱ्यांबरोबर यशस्वीरित्या विकास साधला असल्याची माहिती राज्य भाजप (BJP) कार्यकारिणी सदस्य जयंत जाधव यांनी दिली.

मुरगावात विद्यमान आमदारांच्या विधानावर भाजप नेत्यांची टीका
गोव्यात मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता खातेवाटपासाठी विलंब

पुढे जयंत जाधव म्हणाले की, गेली पंधरा वर्षे भाजपने मुरगावात (Mormugao) विकास कामाबरोबर युवकांना सरकारी नोकऱ्या देण्यास पुढाकार घेतला आहे. मात्र विद्यमान आमदार प्रसारमाध्यमातून मुरगाव दहशतीखाली असल्याचे सांगून एका प्रकारे स्वतःची लाज घालवित असल्याचा खळबळजनक आरोप जाधव यांनी केला. मुरगावच माजी आमदार मिलिंद नाईक (Milind Naik) यांनी येथे खऱ्या अर्थाने विकास साधलेला आहे.

तीन मैदाने, बायणा नवीन भूगटार प्रकल्प, वास्को गांधीनगर ते बोगदा - सडा पर्यंत राष्ट्रीय महामार्ग, कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यास माजी आमदार मिलिंद नाईक यशस्वी ठरले असताना विधानसभेत मुरगावात पाण्याचा प्रश्न भेडसावित असल्याचा आरोप करून विद्दमान आमदार मुर्खपणाचे प्रश्न करीत आहेत. मुरगावात दहशत आता खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. कारण विद्दमान आमदार काँग्रेसचा असल्याने त्यांच्यात दहशत निर्माण करण्याची मोठ्या प्रमाणात क्षमता आहे.

मुरगावातील बोगदा, रूमडावाडा,जेटी भाग डोंगराळ असल्याने तेथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतो. यासाठी गेली अनेक वर्षे मुरगाव नगरपालिका त्यांना आपत्कालीन व्यवस्थापनतर्फे नोटीस बजावत आहे. कुठलेही आरोप विद्यमान आमदारानी पालिकेवर करू नये. पावसाळ्यात एखादी दुर्घटना घडल्यास विद्यमान आमदारांनी स्वत: येथील जनतेची काळजी घेणार आहे तर तसे लिहून द्यावे, असे आवाहन नगराध्यक्ष दामोदर कासकर यांनी केले.

जनतेची काळजी पालिकेला असल्याने अनेक वर्षापासून सदर नोटीस घरमालकांना देण्यात येत आहे. त्यांचे राजकारण करून आमदारांनी जनतेची दिशाभूल करू नये. वीज विभागाबरोबर इतर विभागातील कर्मचा-यांच्या बदल्या नित्यक्रमाने केलेल्या आहेत. यात अजिबात राजकारण नसल्याचा खुलासा नगरसेवक लिओ रॉड्रीगीस यांनी केला.

मुरगावातील सडा भागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी माजी आमदार मिलिंद नाईक यांनी सोडविला आहे. आपण आणखीन किती विकास करणार यांची जनतेला माहीती द्यावी, उगाच खोटे बोलून स्वत:ची लाज विधानसभेत काढू नये,असा निर्वाणीचा इशारा नगरसेविका कृणाली मांद्रेकर यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com