काणकोण: काणकोण मतदारसंघातून भाजपचे उमेदवार माजी मंत्री रमेश तवडकर हे 3051 मताधिक्क्य घेऊन निवडून आले.त्यांना 9063 मते मिळाली तर त्याचे निकटचे प्रतिस्पर्धी आणि भाजपला निवडणुकीपूर्वी सोडचिठ्ठी दिलेले माजी उपसभापती फर्नांडिस यांना 6012 मते मिळाली. तर कॉंग्रेसचे उमेदवार जनार्दन भंडारी यांना 5351 मतांवर समाधान मानावे लागले.
काणकोणच्या मतदारांनी सत्ताधारी पक्षाचे उमेदवार रमेश तवडकर यांना पसंती देऊन निवडणुकीत यश प्राप्त करून दिले आहे.तर कॉंग्रेसमधून विकासासाठी भाजपात गेलेल्या माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांना दुसऱ्या स्थानावर ठेवले आहे.
कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते व लढवय्ये जनार्दन भंडारी यांना निवडणुकीत मतदारांनी तिसऱ्या स्थानावर फेकले आहेत.इजिदोर फर्नांडिस यांनी पैंगीण मतदारसंघातून अपक्ष उमेदवारीवर पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढविली.त्यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला.आता ही निवडणूक अपक्ष लढवून त्यांना पराभवाला सामोरे पराभूत व्हावे लागले आहे.त्यामुळे ही त्यांची शेवटची निवडणूक की, ते पुन्हा लढणार हे येणाऱ्या काळच ठरविणार आहे. काणकोण मतदारसंघात आजपर्यत ख्रिश्चन समाजाचा उमेदवार निवडून आला नव्हता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.