आपकडून काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला मोठे नुकसान, मोरेन रिबेलो झेंडा फडकवणार का?

सर्व पक्ष सारखेच आहेत पण यावेळी आपल्याला बदल घडवून आणण्याची गरज; स्थानिक नागरिक
Curtorim Moreno Rebello
Curtorim Moreno Rebello Dainik Gomantak
Published on
Updated on

फ्रान्सिस सार्दिन यांनी 1977 मध्ये काँग्रेससाठी प्रथम कुडतरीत जागा जिंकल्यापासून, या मतदारसंघातील आतापर्यंतच्या 10 पैकी 8 जागा जिंकून काँग्रेसने नेहमीच इथे विजयाचा आनंद लुटला आहे. अँटोनियो गावकर यांनी 1994 मध्ये यूजीडीपीच्या तिकिटावर विजय मिळवून अस्वस्थता निर्माण केली होती.

लॉरेन्स यांनी काँग्रेसच्या (Congress) तिकिटावर गेल्या दोन निवडणुका जिंकल्या आहेत. नंतर त्यांनी पक्ष सोडला आणि टीएमसीमध्ये (TMC) सामील झाले आणि नंतर त्यांच्यावर कार्यकर्ते नाराज झाले त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि टीएमसीचा राजीनामा दिला.

Curtorim Moreno Rebello
भाजपच्या कमिशनची रक्कम विकासाचे प्राधान्यक्रम ठरवते, सरदेसाईंची बोचरी टीका

या मतदारसंघात 29,000 पेक्षा जास्त मतदार असून महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. 2017 मध्ये, लॉरेन्स यांना 12,722 मते मिळाली, 7642 मतांच्या फरकाने विजयी झाले. भाजप 5080 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. आम आदमी पक्षाने 2688 मते मिळवली. मोठ्या प्रमाणात कृषीप्रधान आणि ख्रिश्चनबहुल असा हा मतदारसंघ आहे, कुडतरीला मागील सरकारने दुर्लक्षित केले आहे असा आरोप मतदार करत आहेत.

परंतु लॉरेन्स (Aleixo Reginaldo) विरोधी बाकावर बसल्याने कचऱ्याचे ढिगारे सोडवण्यात आलेले अपयश, घनकचरा व्यवस्थापनातील अपयश, बेरोजगारी आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे मतदारसंघात नागरिक त्रस्त आहेत. कुटुंबे आणि स्थानिक तरुण सरकारी नोकऱ्या आणि मोठ्या पायाभूत प्रकल्पांची मागणी करतायत.

दरम्यान, काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून कुडतरीची ओळख आहे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोरेन रिबेलो (Moreno Rebello) यांनी काँग्रेसचा झेंडा फडकत ठेवण्याची काँग्रेसला अपेक्षा आहे आणि राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी पक्ष नेतृत्वावरही विश्वास आहे. स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की रिबेलोला पहिल्यांदाच आमदार होण्यासाठी घाम गाळावा लागेल.

Curtorim Moreno Rebello
त्रिकोणी लढतीत भाजपच्या निष्ठावंतांनी गटबाजी केल्याने गोविंद गावडे अडचणीत?

कुडतरीमध्ये रिंगणात असलेल्या आठ उमेदवारांपैकी 'आप'चे (AAP) गावकर काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला मोठे नुकसान करू शकतात. राज्यात कोविड-19 साथीच्या रोगाच्या प्रादुर्भावात मतदारसंघात चांगले काम केल्याच नागरिक बोलत आहेत. तसेच हे कॅथलिक एसटी समुदायामध्ये जबरदस्त प्रभावी ठरू शकतात. भाजपचे उमेदवार अँथनी बार्बोझा हे देखील एसटी समुदायाचे आहेत, त्यामुळे मतदार यांना देखील प्रतिसाद देतील असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

स्थानिक मोटरसायकल पायलट म्हणतात, “सर्व पक्ष सारखेच आहेत पण यावेळी आपल्याला बदल घडवून आणण्याची गरज आहे. मात्र 14 फेब्रुवारी रोजी जेव्हा कुडतरीत मतदानासाठी नागरिक बाहेर पडतील तेव्हा उर्वरित चित्र स्पष्ट होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com