Goa BJP: आमदार समर्थक की निष्ठावंताला संधी? 'तरुण' नेतृत्वासाठी भाजपमध्ये वयाचे निकष; कार्यकर्ते मात्र संभ्रमात

Goa Politics: भारतीय जनता पक्षाने (भाजप) अखेर मंडळ अध्यक्ष आणि जिल्हा स्तरावर नेतृत्वाच्या भूमिकेसाठी वयाचे निकष लागू केले आहेत.
Goa BJP Updates
Amit Shaha|J P Nadda|Pramod Sawant|Vishwajit Rane Canva
Published on
Updated on

BJP age limit for leadership roles

पणजी: भारतीय जनता पक्षाने (भाजप) अखेर मंडळ अध्यक्ष आणि जिल्हा स्तरावर नेतृत्वाच्या भूमिकेसाठी वयाचे निकष लागू केले आहेत. मंडळ अध्यक्षासाठी ४५ आणि जिल्हाध्यक्षपदासाठी वयाची ६० वर्षे कमाल वयोमर्यादा ठेवली आहे. त्यामुळे तरुण नेत्यांना संधी देण्याच्या दिशेने भाजपचे हे पाऊल असल्याचे दिसते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, पक्षाच्या हायकमांडकडून अधिकृत आदेशाद्वारे जाहीर करण्यात आलेला हा निर्णय जिल्हाध्यक्षांसाठी ६० ची उच्च वयोमर्यादा निश्चित करतो आणि मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्यांसाठी ४५ वर्षांखालील व्यक्तींसाठी कटिबद्ध रहात आहे. काही दिवसांपूर्वी तानावडे यांनी पुढील पंधरा दिवसांत नवे मंडळ अध्यक्ष निवडले जाणार असल्याचे जाहीर केले होते. उपाध्यक्ष, सचिव आणि सरचिटणीस या पदांसाठी मात्र कोणतीही अट पक्षाने ठेवली नाही.

Goa BJP Updates
Goa BJP: भाजपच्या पणजी मुख्यालयात जल्लोष! फटाक्यांची आतषबाजी; Social Media वर आनंदोत्सव

पक्षाच्या हायकमांडकडून वयाच्या अटीची मर्यादा घातली असली तरी गोव्यात भाजपने अजूनही ही अट लागू केलेली नाही. अनेक मंडळाचे अध्यक्ष हे आमदारांचे समर्थक आहेत आणि बरेच आमदार काँग्रेसमधून भाजपात आले आहेत. त्यामुळे भाजपच्या निष्ठावानांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झालेली आहे.

पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा आणि पक्ष बळकट करण्याचा उद्देश असला तरी गोव्यात ही वयाची अट लागू झाल्याशिवाय निष्ठावानांना संधी मिळणार नाही, अशी चर्चा काही दिवसांपासूनच सुरू आहे. याशिवाय पक्ष वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांनाही विविध पदांवर काम करण्याची संधी दिली जाणार आहे. पक्षाचे किमान ५० नवीन सक्रिय सदस्यांची नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे संघटना मजबूत होईल, असा विश्वास भाजपच्या श्रेष्ठींना आहे. उद्या, रविवारी भाजपच्या संघटनेबाबत दिल्लीत बैठक होणार आहे.

Goa BJP Updates
T Raja Singh: गोव्यात बांग्लादेशचा झेंडा फाडणारे BJP चे टायगर MLA कोण आहेत?

भाजपच्या मंडळ अध्यक्षाची वयोमर्यादा ४५ वर्षांपेक्षा कमी राहणार असल्याची ‘खरी कुजबुज’ गोमन्तकने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली होती. या कुजबुजची भाजपमध्ये बरीच चर्चा सुरू होती. त्यामुळे पणजीत भाजपचा मंडळाध्यक्ष कोण होणार यावर अटकळ बांधल्या जात होत्या. आता वयाची अट लागू झालीच, तर आमदार समर्थक की भाजपनिष्ठ कार्यकर्त्याला मंडळाचे अध्यक्ष म्हणून संधी मिळणार याकडे पणजीतील भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com