T Raja Singh: गोव्यात बांग्लादेशचा झेंडा फाडणारे BJP चे टायगर MLA कोण आहेत?

Pramod Yadav

कट्टर हिंदुत्ववादी टी. राजासिंह

कट्टर हिंदुत्ववादी आणि प्रक्षोभक वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असणारे भाजपचे आमदार टी. राजासिंह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

T. Raja Singh

गोव्यात शौर्य यात्रा

टी. राजासिंह यांनी गोव्यातील शौर्य यात्रेला हजेरी लावत कार्यक्रमात विविध वक्तव्य केले.

T. Raja Singh

बांग्लादेशचा झेंडा फाडला

टी राजासिंह यांनी गोव्यात बांग्लादेशचा झेंडा फाडला तसेच, गोव्यातील हिंदूंना एकत्र येण्याचे आवाहन केले.

T. Raja Singh

हिंदूंची संख्या कमी

गोव्यातील हिंदूंची संख्या कमी होत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच, मुस्लिमांची संख्या वाढत असल्याचा दावा केला.

T. Raja Singh

लव्ह जिहाद

लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदू समाजातील महिलांना टार्गेट केले जात असल्याचेही टी. राजासिंह यावेळी म्हणाले.

T. Raja Singh

ख्रिस्तींना आवाहन

लव्ह जिहादविरोधातील लढाईत हिंदूंसोबत येण्याचे आवाहन त्यांनी गोव्यातील ख्रिस्ती बांधवांना केले.

T. Raja Singh

गोशामहालचे आमदार

टायगर म्हणून प्रसिद्ध असणारे राजासिंह तेंलगणा राज्यातील भाजपचे आमदार आहेत. सिंह गोशामहाल मतदारसंघातून निवडून येतात.

T. Raja Singh

निलंबन

राजासिंह यांना मोहम्मद पैंगबर यांच्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी ऑगस्ट २०२२ रोजी निलंबित करण्यात आले होते. एक वर्षानंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले.

T. Raja Singh

१०५ गुन्हे

टी. राजासिंह भाजपचे एक वादग्रस्त आमदार म्हणून ओळखले जातात. त्यांच्यावर १०५ गुन्हे नोंद आहेत. यातील १८ सांप्रदायिक गुन्हे आहेत.

T. Raja Singh
आणखी पाहण्यासाठी