Goa Politics: भाजप सरकारने रचले माझ्या विरोधात षडयंत्र : आल्मेदा

Goa Politics: माझ्या कार्यकाळातील प्रकल्प मुद्यामहून अडवून भाजप सरकारने माझ्या विरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी केला.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak

Goa Politics: माझ्या कार्यकाळातील प्रकल्प मुद्यामहून अडवून भाजप सरकारने माझ्या विरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी केला. तसेच विद्यमान वास्कोच्या आमदारांनी स्थानिक युवकांवर अन्याय करून त्यांना नोकरीपासून वंचित ठेवले आहे.

Goa Politics
Goa Drug Case: ‘ड्रग्ज’प्रकरणी गोवा-महाराष्ट्र सीमेवरील ‘सासोली’ रडारवर

कदंब बस स्थानकावरील प्रशासकीय इमारतीचे बांधकाम अजूनही होत नसल्याने याला पूर्णपणे राज्य सरकार व स्थानिक आमदार अपयशी ठरले असून रेल्वे दुपदरीच्या नावाखाली वास्को - शांतिनगर येथे घरे पाडण्यात आल्याचा खळबळजनक आरोप माजी आमदार आल्मेदा यांनी केला आहे.

वास्को येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत माजी नगराध्यक्ष सुचिता शिरोडकर, वास्को काँग्रेस गटाध्यक्ष ॲड. मॅलविन फर्नांडिस, मिलिंद आरोलकर उपस्थित होते.

आल्मेदा पुढे म्हणाले, की भाजप सरकारने सदैव वास्को मतदारसंघावर अन्याय केला आहे. माझ्या कार्यकाळात मला देण्यात आलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कधीच सहकार्य केले नाही. भाजप सरकारचे वास्कोचे आमदार येथील युवकांना नोकरी देण्यास अपयशी ठरले आहेत.

युवकांना स्थानिक आमदारांनी गोवा शिपयार्ड, बंदरातील खासगी आस्थापनात किंवा इतर कंपनीत नोकरी देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. परंतु स्थानिक आमदार येथील युवकांना गेले वर्षभर फक्त नोकरीचे आमिष दाखवून फसवत आहेत.

यावेळी वास्को काँग्रेस गटाध्यक्ष ॲड. मॅलविन फर्नांडिस यांनी सांगितले की, दाबोळी विमानतळावरील विमाने मोपा विमानतळावर वळविण्याचे षडयंत्र केंद्र व राज्य सरकार करीत आहे.

काँग्रेसचे उमेदवार निवडून येणार

रेल्वे दुपदरीकरणाच्या नावाने नवेवाडे शांतिनगर येथील घरे पाडण्यात येत असल्याची माहिती आल्मेदा यांनी दिली. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यातील काँग्रेस उमेदवाराला वास्को मतदारसंघातून ११ हजारपेक्षा जास्त मते देणार असल्याचे आल्मेदा यांनी सांगितले. दक्षिण व उत्तरेत येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार निवडून येणार असल्याचेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com