BJP
BJPDainik Gomantak

Goa Panchayat: केपे तालुक्यावर भाजपचे वर्चस्व

केपे तालुक्यातील अकरा पंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज झाला असून यात भाजपने बाजी मारली आहे.

केपे: केपे तालुक्यातील अकरा पंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज झाला असून यात भाजपने बाजी मारली आहे.केपे तालुक्यातील अकरा पंचायतींपैकी एकमेव मोरपिर्ला पंचायत काँग्रेसकडे गेली असून उर्वरित दहा पंचायती भाजपने आपल्याकडे राखण्यात यश मिळवले असल्याचा दावा भाजपने केला आहे.

(BJP dominates quepem taluka for goa panchayat election)

BJP
Goa Panchayat Election: बार्देशात अपक्ष उमेदवार चमकले

बाळ्ळी व बेतूल पंचायतीवरही आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी दावा केला आहे. या दोन पंचायती आपल्या असा दावा भाजपही करत आहे. बाकी फातर्पा, अवेडे, बार्शे, आंबावली पंचायत भाजपाकडे आली आहे, तर शेल्डे व असोल्डा कुडचडे मतदारसंघात येत असून त्या भाजपाकडे आल्या आहेत, तर मळकर्णे व रिवण या दोन्ही पंचायती सांगे मतदारसंघात येत असून त्याही भाजपाकडे आल्या आहेत.

कुडचडे मतदारसंघातिल शेल्डे व असोल्डा पंचायत कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी आपल्याकडे राखण्यात यश मिळवले आहे. गेल्यावेळीसुद्धा या पंचायती काब्राल यांच्या ताब्यात होत्या. सांगे मतदारसंघातिल कावरेपिर्ला व मळकर्णे पंचायत भाजपाकडे आली आहे. कावरेपिर्ला पंचायतीतून तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी सांगे मतदारसंघातील सर्व पंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला असल्याचे सांगितले.

सात पंचायतींवर बाबू कवळेकर समर्थक विजयी

या निवडणुकीत खरी लढत केपे मतदारसंघात होती. नवनिर्वाचित आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी पंचायतींवर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी बरीच धडपड केली होती, पण बाबू कवळेकर यांनी सात पंचायतींवर भाजपा उमेदवार निवडून आणले. आठ पंचायतींपैकी बाळ्ळी व आंबावली पंचायत कुंकळ्ळी व केपे मतदारसंघात येत असल्याने युरी आलेमाव यांना या पंचायती भाजपाकडे आल्याने धक्का बसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com