Goa Congress: भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या भाजपने धर्म शिकवू नये- दिनेश गुंडू राव

Goa Congress: भाजपकडून निवळ्ळ सर्वच क्षेत्रांत दडपशाही सुरु आहे.
Dinesh Gundu Rao | Goa Congress
Dinesh Gundu Rao | Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress: स्थानिक पातळीपासून केंद्रापर्यंत भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या भाजपने आम्हाला धर्म शिकवू नये, अशी टीका करत भाजपविरोधी लढ्यासाठी आणि पक्ष बळकटीसाठी 26 जानेवारीपासून ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान सुरू करणार असल्याची माहिती काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी दिली.

काँग्रेसच्या कार्यालयातील पत्रकार परिषदेत राव बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, उपाध्यक्ष एम. के. शेख उपस्थित होते. यावेळी राव म्हणाले की, भाजपने पक्षांतर बंदी कायद्यातील पळवाटा शोधून सत्ता बळकावली.

भाजपकडून सर्वच क्षेत्रांत दडपशाही सुरू आहे. याविरोधात काँग्रेस लढत राहील. यासाठी 1 जानेवारीपासून राज्यात सर्व मतदारसंघांत जनसंपर्क मोहीम सुरू करण्यात येणार आहे, तर 26 जानेवारीपासून ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान सुरू केले जाणार आहे. या अभियानांतर्गत राज्यातील सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल.

खाण व्यवसाय लवकर सुरू होणे अशक्य

खाणी सुरू करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न स्वागतार्ह असले तरी सध्याचे ई-लिलाव यशस्वी होतील, असे म्हणता येणार नाही. कारण यापूर्वीचे लिलाव अयशस्वी झालेत. खाणी सुरू होण्याविषयी शंका आहे, असे मत अमित पाटकर यांनी व्यक्त केले.

Dinesh Gundu Rao | Goa Congress
Goa BJP: गोव्यात भाजपकडून बिलावल भुट्टो झरदारीच्या पुतळ्याचे दहन करत मोदींविरुद्धच्या वक्तव्याचा निषेध

गोवा फॉरवर्डशी युतीबाबत अनभिज्ञ

यावेळी राव म्हणाले की, गोवा फॉरवर्ड हा युपीएचा सहयोगी पक्ष होता. आता त्यांच्यासोबतची युती तुटली आहे का, हे माहीत नाही. पुन्हा निवडणुका आल्यानंतर त्याबाबत विचार केला जाईल, असे सांगून त्यांनी युतीबाबत अनभिज्ञता दर्शविली.

म्हादईप्रश्‍नी कर्नाटक काँग्रेस जनतेसोबत

म्हादई नदीचे पाणी कर्नाटक सरकारने वळविले असून गोवा फॉरवर्डने केलेल्या आरोपांविषयी विचारले असता, दिनेश गुंडू राव म्हणाले की, कर्नाटकमधील काँग्रेस तेथील जनतेबरोबर असेल. तो तिथल्या स्थानिक जनतेचा आणि सरकारचा निर्णय असेल आणि त्याचा सर्वांनी सन्मान केला पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com