BITS Pilani च्या वसतिगृहात उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्यांने घेतला टोकाचा निर्णय; 5 महिन्यांत तिघांनी संपवले आयुष्य

Goa Crime: बिट्स पिलानी येथील वसतिगृहात गेल्या पाच महिन्यांपासून आत्महत्यांची मालिका सुरूच असून, गुरुवारी (२ मे) एका २० वर्षीय विद्यार्थ्याने टोकाचा निर्णय घेत जीवन संपवल्याची घटना समोर आली.
BITS Pilani
BITS PilaniDainik Gomantak
Published on
Updated on

झुआरीनगर: बिट्स पिलानी येथील वसतिगृहात गेल्या पाच महिन्यांपासून आत्महत्यांची मालिका सुरूच असून, गुरुवारी (२ मे) एका २० वर्षीय विद्यार्थ्यानं गळफास लावून घेतल्याची घटना समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यांत कॅम्पसमध्ये घडलेली ही आत्महत्येची तिसरी घटना आहे.

लखनऊ (उत्तर प्रदेश) येथील कृष्णा केसरा असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. परीक्षा सुरू असतानाच त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याची वाढती समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

वेर्णा पोलिसांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा गुरुवारी सकाळी १०:१५ वाजता आपल्या वसतिगृहातील खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. प्राथमिक चौकशीनंतर नैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

BITS Pilani
Goa Crime: गोव्यात मटका अड्ड्यांविरुद्ध मोठी कारवाई, विविध ठिकाणी 12 बुकींना अटक; रोख रकमेसह जुगार साहित्य जप्त

कुटुंबीयांकडून मृतदेह स्वीकारण्यास नकार

मृत विद्यार्थी कृष्णा कसेरा याच्या कुटुंबीयांनी कृष्णाचा मृतदेह स्वीकारण्यास दिला नकार दिला आहे. कुटुंबीयांनी कॉलेज प्रशासनाकडे थेट मागणी केली आहे की, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली जातील याबाबत तत्काळ स्पष्टीकरण द्यावे. तसेच, अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी त्यांनी केलीय.

BITS Pilani
Goa Crime: नाइटक्लबकडे जाणाऱ्या दोघांवर चाकूहल्ला, जीवे मारण्याचा प्रयत्न; 12 वर्षांनी आरोपींना 4 वर्षे कैद , 25 हजार रु दंड

या घटनेमुळे केवळ परिसरातच नव्हे तर राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. यापूर्वी ४ मार्च २०२५ रोजी आणि १० डिसेंबर २०२४ रोजी अशाच प्रकारे दोन विद्यार्थी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत आढळले होते.

क्रूझ सिल्वा यांची चौकशीची मागणी

गोव्यातील बिट्स पिलानीच्या कॅम्पसमध्ये पाच महिन्यांत तिसऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा यांनी या प्रकारणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

बिट्स पिलानीच्या कॅम्पसमध्ये दोन महिन्यांत दुसऱ्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे विद्यार्थी, पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. अशा प्रकारच्या दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कॉलेज प्रशासन, शिक्षण खाते आणि संबंधित यंत्रणांनी योग्य ती पावले उचलण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आणि त्यांचं मानसिक स्वास्थ्य जपण्याची जबाबदारी संस्थांवर असल्याचं क्रूझ सिल्वा यांनी स्पष्ट केलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com