Birsa Munda Jayanti 2026: आज बलिदानाची नव्हे, तर परस्पर सहकार्याची गरज; बिरसा मुंडा जयंतीनिमित्त मुख्यमंत्री सावंतांचे आवाहन

CM Pramod Sawant Statement On Birsa Munda Jayanti 2026: भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा देत क्रांती घडवून आणली आणि देशासाठी आपले प्राण अर्पण केले.
CM Pramod Sawant Statement On Birsa Munda Jayanti 2026
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

साखळी: भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा देत क्रांती घडवून आणली आणि देशासाठी आपले प्राण अर्पण केले. आजच्या काळात अशा प्रकारे बलिदान देण्याची गरज नाही. समाजातील प्रत्येकाने एकमेकांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१व्या जयंतीनिमित्त डिचोली तालुक्यातील सुर्ल गावात आयोजित ‘जनजातीय गौरव दिवस २०२६’ कार्यक्रमात मुख्‍यमंत्री बोलत होते. देशभरात हा दिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील गडचिरोली येथून देशवासीयांना संबोधित केले. गोवा सरकारच्या जनजातीय कल्याण संचालनालय आणि जनजातीय संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधानांच्या भाषणाचे राज्यातील पाच ठिकाणी थेट प्रक्षेपण करण्यात आले.

CM Pramod Sawant Statement On Birsa Munda Jayanti 2026
CM Pramod Sawant Meeting: समन्वयातून राज्यातील प्रलंबित प्रश्न सोडवा; मुख्यमंत्र्यांचे वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत निर्देश

सुर्ल गावातील बाये येथील श्री सातेरी मंदिरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी सरकारी योजनांचा लाभ घेतल्यानंतर तो इतर गरजूंपर्यंतही पोहोचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. एखाद्याला नोकरी मिळाल्यानंतर इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. अशा सामूहिक प्रयत्नांतून समाजातील एकोपा वाढेल आणि त्यातून आपली संस्कृती व परंपरा टिकून राहतील, असे ते म्हणाले.

CM Pramod Sawant Statement On Birsa Munda Jayanti 2026
CM Pramod Sawant: "गोवा परप्रांतीयांची 'दुबई' होऊ देऊ नका!" मुख्यमंत्री सावंतांचे युवकांना आवाहन; राज्य-केंद्र सरकारकडून आर्थिक मदतीचा हात

भाजपच्या गोवा (Goa) प्रभारी भारती पवार यांनी आदिवासी समाजाच्या ऐतिहासिक योगदानावर प्रकाश टाकला. देशासाठी आदिवासी क्रांतिकारकांनी केलेला संघर्ष आणि दिलेले बलिदान यांचा गौरवशाली इतिहास आजवर सर्वसामान्य जनतेपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचलेला नाही. हा इतिहास जनतेसमोर आणण्याचे काम विद्यमान सरकार करत आहे, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Birsa Munda
CM Pramod Sawant
Goa wedding destination registration
CM pramod sawant kannada remark controversy