Arpora Nightclub Fire: हडफडे अग्नितांडवातील संशयित अधिकाऱ्यांवर सरकार मेहरबान; चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच सिद्धी हळर्णकर, शमिला मोंतेरो यांचे निलंबन मागे

Government Official Reinstatement: हडफडे येथील या क्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन पंचायत सचिव रघुवीर बागकर यांच्यासह हळर्णकर आणि डॉ. मोंतेरो यांना निलंबित करण्यात आले होते.
Government Official Reinstatement
Arpora Nightclub FireDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘बर्च बाय रोमिओ लेन’ येथील अग्नीतांडव प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या तत्कालीन पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तत्कालीन सदस्य सचिव डॉ. शमिला मोंतेरो यांच्यावर सरकार मेहरबान झाल्याचे उघड झाले आहे. दक्षता खात्याकडून चौकशी सुरू होण्यापूर्वीच त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.

हडफडे येथील या क्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन पंचायत सचिव रघुवीर बागकर यांच्यासह हळर्णकर आणि डॉ. मोंतेरो यांना निलंबित करण्यात आले होते. ७ डिसेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशात दक्षता खात्याकडून चौकशी करण्यासाठी हे निलंबन करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते.यानंतर दक्षता खात्याकडून तिघांची चौकशी अपेक्षित होती. मात्र प्रत्यक्षात पंचायत संचालकांनी चौकशी करून बागकर यांच्यावर ठपका ठेवत त्यांना सेवेतून बडतर्फ केले होते.

Government Official Reinstatement
Arpora Nightclub Fire: हडफडे दुर्घटनेप्रकरणी 13 जणांवर तब्बल 4,150 पानांचे दोषारोपपत्र; 305 साक्षीदारांचे नोंदवले जबाब

चाैकशीसाठी समिती पण...

सरकारने या प्रकरणी जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. समितीने अहवाल सादर केला. हा अहवाल दक्षता खात्याला मिळाल्यानंतर दुहेरी चौकशी टाळता येईल, असा विचार करण्यात आला असावा. मात्र, अखेरपर्यंत या दोन्ही अधिकाऱ्यांना दक्षता खात्याकडून चौकशीसाठी पाचारण करण्यात आले नाही. अखेरीस सरकारच्या सूचनेनुसार २२ फेब्रुवारी रोजी त्यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्याचे आदेश जारी करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com