Biporjoy Cyclone News : गोव्याच्या दिशेनं येतंय बिपरजॉय चक्रीवादळ; हवामान खाते म्हणाले...

मासेमारी करणाऱ्यांना समुद्रात न जाण्याचे हवामान विभागाचे आवाहन
Biporjoy cyclone
Biporjoy cycloneDainik Gomantak

Biporjoy cyclone : राज्याच्या हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. अरबी समुद्रात नवे चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. गोवा हवामान विभागामार्फत मासेमारी करणाऱ्यांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अरबी समुद्रात तयार होणाऱ्या या चक्रीवादळाला बिपरजॉय चक्रीवादळ असं संबोधलं जात आहे.

Biporjoy cyclone
महानायक बच्चन यांची नात गोव्यावरून परतली पण तिच्या सोबतचा 'तो' कोण? चर्चा रंगली, व्हिडिओ व्हायरल

स्कायमेटने वर्तविलेल्या अंदाजानुसार, प्रत्येक चक्रीवादळाला वेगवेगळी नावे दिली जातात. 2023 मधले पहिले चक्रीवादळ मे महिन्यात बंगालच्या उपसागरात तयार झाले होते. या चक्रीवादळाचे नाव मोचा असे होते. आता अरबी समुद्रात तयार होणाऱ्या चक्रीवादळाचे नाव बिपरजॉय असेल आणि हे नाव बांग्लादेशने दिल असल्यांची माहिती दिली.

केरळमध्ये 4 जूनला मान्सून दाखल होणार होता मात्र अजूनही केरळमध्ये मान्सून दाखल झाला नाही आहे. आणखीन 3 ते 4 दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा मान्सून 7 किंवा 8 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होऊ शकतो.

बिपरजॉय चक्रीवादळ गोव्याला येवून धडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बिपरजॉय चक्रीवादळ हे गोव्यापासून 930 किमी अंतरावर आहे. पुढील 48 तासांत हे वादळ कोकण किनारपट्टीला धडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com