Goa News : बीजमाता राहीबाई पोपेरे सोमवारी येणार गोमंतकीयांच्या भेटीला!

सरमोकादम : जागतिक जैवविविधता दिनानिमित्त तीन दिवसीय कार्यक्रम
Rahibai Popare
Rahibai PopareGomantak Digital Team
Published on
Updated on

पणजी : गोवा राज्य जैवविविधता मंडळाच्या वतीने यंदा जागतिक जैवविविधता दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती मंडळाचे सचिव प्रदीप सरमोकादम यांनी दिली. या कार्यक्रमास विशेष पाहुण्या म्हणून बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे उपस्थित राहणार असून त्यांचे बीजभाषण होणार आहे.

याशिवाय केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्या उपस्थितीत नेवरा येथे विविध कार्यक्रम होणार आहेत. सरमोकादम म्हणाले की, यंदा जागतिक जैवविविधता दिन 21 ते 23 मे या कालावधीत साजरा केला जाणार आहे.

Rahibai Popare
Daily Horoscope 20 May: आज कशी असेल तुमच्या ग्रहांची स्थिती? कसा जाणार आजचा दिवस? वाचा तुमचे राशीभविष्य

21 मे रोजी सकाळी 6.30 ते 9 पर्यंत कळंगुट, कोलवा किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम होईल. 22मे रोजी जैवविविधता दिन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्रातील अहमदनगर येथील बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांना निमंत्रित केले असून त्यांचे बीजभाषण होईल. यावेळी पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल आणि इतर मान्यवरांंची भाषणे होतील.

Rahibai Popare
Goa Petrol-Diesel Price: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, गोव्यात काय स्थिती? जाणून घ्या ताजे भाव

राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम

23 मे रोजी राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम होणार असून यात केंद्रीय मंत्र्यांसह केंद्रीय सचिव अरुण कुमार मिश्रा, राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाचे अध्यक्ष रेड्डी, पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भाषणे होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com