'ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक, त्यांनी बहुजनांना संपविण्याचा प्रयत्न केला'; मंत्री गावडेंनी ढवळीकरांचा इतिहासच काढला

Goa Politics: मगोला युतीत घेण्यासाठी सुरुवातीला मीच विरोध केला होता, असे क्रीडा मंत्री गोविंद गावडे म्हणाले.
Minister Govind Gaude
Minister Govind GaudeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांच्यात युतीवरुन सध्या वादाला तोंड फुटले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रियोळ मतदारसंघाबाबत केलेले वक्तव्य आणि त्यानंतर मंत्री गावडेंनी ढवळीकरांवर केलेल्या टीकेवरुन युतीत धूसफूस सुरु झालीय. कला - सांस्कृतिक आणि क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी पुन्हा एकदा ढवळीकर बंधुंवर टीका करत त्यांचा इतिहासच बाहेर काढला.

'विद्यमान वीज खात्याचे मंत्री सुदीन ढवळीकरांना राजकारणात घेऊन येणे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. ढवळीकरांनी गोव्यातील बहुजनांमध्ये फूट पाडण्याचे काम केले. लाचारीचा मार्ग देखील याच माणसाने दाखवला', अशी टीका मंत्री गोविंद गावडे यांनी सुदीन ढवळीकरांवर केली. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मंत्री गावडे बोलत होते. 'ढवळीकरांना जाहीर सभेत बोलता देखील येत नव्हते त्यांची भाषणे तयार करण्याचे काम मीच केले', असे गावडे म्हणाले.

Minister Govind Gaude
Goa News: "पंचांना लाज वाटली पाहिजे" मुख्यमंत्र्यांनी सर्वण वासियांना सुनावले खडे बोल

'सत्तेची हाव लागल्यानंतर त्यांनी मतदार नियंत्रणात ठेवण्यासाठी विचित्रच काम सुरु केले. या गोष्टीला सर्वात पहिल्यांदा मीच विरोध केला होता. अडपईत त्यांनी लिफाफे वाटण्यास सुरुवात केली. त्याचवेळी तुम्ही हे चुकीचे करताय असेही मीच सांगितले होते. घराघरांत वाद लावण्याचे काम त्यांनी केले', असा आरोप मंत्री गावडेंनी या मुलाखतीत केला. 'राजकारणात यांनी घेऊन येण्याची चूक मी केली असली तरी एकाला घरी बसवण्याचे काम मी केले. प्रियोळच्या लोकांचा मी आभारी आहे', असेही मंत्री गावडे म्हणाले.

Minister Govind Gaude
Marathi Language: गोव्यात मराठी, कोकणी या भाषा भगिनी आनंदाने नांदाव्यात हा ‘सूर’ महत्त्वाचा

लवू मामलेदारांची अवस्था या लोकांनी काय केली? नरेश सावळ, बाबू आजगावंकर, दीपक पावसकर आणि काशीनाथ जल्मी यांच्या मगोसाठीच्या योगदानाबाबत मंत्री गावडे यांनी भाष्य केले. '२०२२ मध्ये हे लोक मुद्दाम आले आणि सरकारमध्ये खूर्ची मिळवली. यांना खरंच भाऊसाहेबांचा पक्ष वाढवायचा होता तर सरकारच्या विरोधात राहायचे होते. कारण यांना कोणीच सरकारमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रण दिले नव्हते. ते मुंगळ्यासारखे सत्तेला चिकटले', असा आरोप मंत्री गावडे यांनी केला.

मगोला युतीत घेण्यासाठी सुरुवातीला मीच विरोध केला होता, त्यानंतर इतरांनी विरोध केला, असे मंत्री गावडे म्हणाले. ढवळीकर बंधुंना मी आणि विनोद नागेशकर व्यवस्थित ओळखतो. ढवळीकरांनी आम्हा दोघांमध्ये भांडण लावण्याचा देखील प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही, असा आरोप देखील मंत्री गावडे यांनी मुलाखतीत केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com