म्हापसा : पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, बार्देश तालुक्यातून सहा उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. तर छाननीवेळी एकूण ११४२ नामांकन वैध धरण्यात आले. बुधवारी (ता. २७) अर्ज मागे घेण्याचा दिवस असून, त्यानंतरच बार्देशातील उमेदवारांचा नेमका आकडा स्पष्ट होईल.
मंगळवारी नामांकन छाननीवेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी एकूण पाच नामांकन नाकारले. यामध्ये कांदोळी पंचायत प्रभाग 7 मधून मारिया ज्योकिम परेरा, साल्वादोर-दी-मुंद प्रभाग 2 मधून रोशनी सावईकर, शिवोली-सडये प्रभाग 1 मधून लाविनो फर्नांडिस, हणजूण-कायसूव प्रभाग 2 मधून पार्वती नागवेकर व हडफडे-नागवा प्रभाग 2 मधून ज्युआस फर्नांडिस यांचे नामांकन अवैध धरले.
तर नादोडा पंचायतीमधून तिघे, तर साल्वादोर-दी-मुंदमधून दोघे व रेईश मागूशमधून एकाची बिनविरोध निवड निश्चित झाली. बार्देशात 33 पंचायतीं असून एकूण 279 प्रभाग आहेत. नादोडा पंचायतच्या प्रभाग 4 मधून माजी सरंपच मधुरा मांद्रेकर यांची बिनविरोध निवड झाली. तर, याच पंचायतच्या प्रभाग 3 मधून परेश गावस व प्रभाग 5 मधून रामा नादोडकर यांचीही बिनविरोध निवड झाली. तर रेईश-मागूश पंचायतच्या प्रभाग 4 मधून संगीता भोसले यांची बिनविरोध निवड झाली.
साल्वादोर-दी-मुंद पंचायतीच्या प्रभाग ३ मधून रीना फर्नांडिस तर प्रभाग २ मधून संदीप साळगावकर यांची बिनविरोध निवड झाली. संदीप साळगावकर हे माजी सरपंच तर रिना फर्नांडिस या माजी उपसरपंच होत्या. या दोघांना पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांचा पाठिंबा लाभला.
छाननीदरम्यान दोन ठिकाणी असे घडले नाट्य...
1 हणजूण पंचायतीच्या प्रभाग 7 मधील पेड्रो मेंडोन्का व रवी हरमलकर यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्यात आले. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी सुनावणी घेत या दोघांची उमेदवारी स्वीकारली. रमेश नाईक यांनी हरकत घेतलेली.
2 कळंगुट पंचायतीच्या प्रभाग 7 मधील फ्रान्सिस रॉड्रिग्स व अॅडेलिना रॉड्रिग्स यांच्या उमेदवारीवर सुद्धा आक्षेप घेण्यात आलेला. मात्र, हा आक्षेप फेटाळत या दोघांची उमेदवारी स्वीकारली. जोसेफ सिक्वेरा यांनी ही हरकत घेतली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.