Goa Politics: दोन दिवसांवर मतदान! SC, ST नेत्यांचा इंडिया आघाडीला पाठिंबा, भाजपने विश्वासघात केल्याचा आरोप

Goa Politics: भाजप एसटी समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप समाजाच्या नेत्यांनी केला.
Goa Politics: दोन दिवसांवर मतदान! SC, ST नेत्यांचा इंडिया आघाडीला पाठिंबा, भाजपने विश्वासघात केल्याचा आरोप
Published on
Updated on

Goa Politics

गोव्यात दोन लोकसभा जागांसाठी येत्या सात मे रोजी मतदान होत असताना, राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. दोन दिवसांवर मतदान आले असताना राज्यातील SC, ST नेत्यांनी इंडिया आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे.

एसटीच्या राजकीय आरक्षणाबाबत भाजपने समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप नेते रुपेश वेळीप यांनी केला आहे.

गोव्यात एसटी आरक्षणाची मागणी समाजातील नेत्यांनी लावून धरली, यासाठी विधानसभेवर देखील मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, लोकसभेसाठी जागा जाहीर होण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये गोव्यातील आदिवासी समाजाला राजकीय आरक्षण देण्यासाठी संसदेत सादर करावयाच्या विधेयकाला मंजुरी मिळाली.

येत्या २०२७ विधानसभा निवडणुकीपूर्वी एसटी समाजाला राजकीय आरक्षण जाहीर केले जाईल, असे आश्वासन दिले आहे.

पण, भाजप एसटी समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप समाजाच्या नेत्यांनी केला.

Goa Politics: दोन दिवसांवर मतदान! SC, ST नेत्यांचा इंडिया आघाडीला पाठिंबा, भाजपने विश्वासघात केल्याचा आरोप
Goa BJP: सावर्डेचे माजी आमदार दीपक पाऊस्कर यांचा भाऊ संदीप यांच्यासह भाजपात प्रवेश

आचारसंहितेपूर्वी मतदारसंघ फेररचना आयोग नेमण्याची प्रक्रिया सुरू न केल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालू, फसवणूक करणाऱ्या सरकारला धडा शिकवू, असा इशारा देखील मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन फॉर शेडुल्ड ट्राईब ऑफ गोवाने दिला होता.

दरम्यान, आता एसटी नेत्यांनी इंडिया आघाडीला पाठिंबा दिल्याने याचा भाजपच्या मतदानावर कसा परिणाम होतो, हे पाहावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

POK Assembly Election Violence 9 Dead
Mopa Formula Racing Event
All India 40 Plus Senior Cricket League
Borim Sai Baba Temple
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com