Bicholim News : हरवळेत पालखी रोखली; चक्क मंदिरात धक्काबुक्की; काहीजण जखमी

Bicholim News : रुद्रेश्वर देवस्थानातील प्रकार; उत्सवाला गालबोट
Bicholim
BicholimDainik Gomantak

Bicholim News :

डिचोली, हरवळे येथील श्री रुद्रेश्वर देवस्थानात आज (रविवारी) पार पडलेल्या देवस्थानच्या पालखी उत्सवातही वादाचा भडका उडाला. पालखी सुरू असतानाच विरोधी गटाकडून मिरवणुकीत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न झाला.

यावेळी झालेल्या झटापटीत काहीजण जखमी झाले. मात्र, परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

विरोधी गटात मोजकेच लोक होते, अशी माहिती मिळाली. या झटापटीनंतरही पालखी सोहळा पार पडला. ''हर हर महादेव’च्या जयघोषात पालखी मंदिरात नेण्यात आली. पालखी सोहळा पार पडला असला, तरी रात्री उशिरापर्यंत रुद्रेश्वर देवस्थान परिसरात तणावपूर्व वातावरण होते.

रविवारी देवस्थान परिसरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात केला होता. यावेळी उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक अक्षत कौशल, पोलिस उपअधीक्षक सागर एकोस्कर आणि वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

रात्री ८ वा. : पालखी उत्सवाला सुरवात.

८.१५ वा. : पालखी ५० मीटर पुढे सरकली.

८.३० वा. : सुमारे ७० स्थानिकांचा जमाव मंदिराकडे सरसावला

८.४० वा. : लाठ्यांसह महिलांचाही मंदिरात प्रवेश

९ वा : विरोधकांनी पालखी रोखली

९ वा. : स्थानिकांकडून पालखी ताब्यात घेण्याचा प्रयत्न

९.१५ वा. : मंदिरात गोंधळाची स्थिती

९.३० वा. : पोलिस मंदिरात आले, झटापट रोखण्याचा प्रयत्न

१० वाजता : काहीजण परतले; मात्र ७०० भंडारी समाज बांधव घटनास्थळी

Bicholim
Goa Tourism: गोव्याच्या ‘पर्यटन’ला डिजिटल प्रचाराचे पाठबळ; ‘अगोडा’शी सामंजस्य करार

खुर्च्या फेकल्या; महिलांना त्रास

विरोधी गटाने प्लास्टिकच्या खुर्च्या फेकून मारल्याने आमच्या समाजाचे दोघेजण जखमी झाल्याचा दावा भंडारी समाजाने केला आहे. या झटापटीत काही महिलांनाही मन:स्ताप झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांत तक्रार करणार असल्याची माहिती देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. गेल्या महिन्यात महाशिवरात्री उत्सवावेळी वाद निर्माण झाल्याने पालखी आणि रथोत्सवात खंड पडला होता.

भंडारी समाजाचा पुनरुच्चार :

महाशिवरात्रीनंतर श्री रुद्रेश्वर देवस्थानचा आज पहिला मासिक पालखी उत्सव होता. रुद्रेश्वर देवस्थान हे भंडारी समाजाचेच असल्याचा पुनरुच्चार करीत या सोहळ्याला भंडारी ज्ञाती बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान समितीने केले होते.

या आवाहनाला अनुसरून राज्यातील भंडारी समाजाचे चार हजारांहून अधिक लोक पालखी सोहळ्याला उपस्थित होते. एकप्रकारे पालखी सोहळ्यावेळी भंडारी समाजाचे शक्तिप्रदर्शनच दिसून आले.

Bicholim
Fishing In Goa: गोव्यात कर्नाटक, महाराष्ट्रातील बोटींचा शिरकाव; पारंपरिक मच्छीमारांना मासळीचा तुटवडा

राजकीय नेत्यांची सोहळ्याला उपस्थिती

या सोहळ्यावेळी कृषिमंत्री रवी नाईक, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, जयेश साळगावकर, माजी आमदार किरण कांदोळकर यांच्यासह विविध राजकीय नेते आणि कार्यकर्ते तसेच देवस्थानचे अध्यक्ष यशवंत माडकर, सचिव सुभाष किनळकर, मुखत्यार संगेश कुंडईकर, उपमुखत्यार वासुदेव गावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. आजचे शक्तिप्रदर्शन पाहता, भंडारी समाज एकसंघ झाल्याचे संकेत मिळत होते.

बिगर भंडारींकडून धिंगाणा : कांदोळकर

पालखी उत्सवावेळी काहीजण मद्यपान करून आले होते. हा धिंगाणा बिगर भंडारींनी घातला, हे दृश्य मी स्वत: पाहिले. भंडारी समाजाच्या आराध्य दैवतापुढेच अशा प्रकारची घटना अशोभनीय आहे. या प्रकारामागे कुठल्या राजकीय नेत्याचा हात आहे, याची चौकशी व्हायला हवी, असे किरण कांदोळकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com