Bicholim Water Supply : डिचोलीत शनिवारपासून तिळारीचे नियमित पाणी

अधिकाऱ्यांची माहिती : आमदारांसमवेत बैठक
Mla Chandrakant Shetya
Mla Chandrakant ShetyaGomantak Digital Team
Published on
Updated on

Bicholim Water Supply : डिचोलीच्‍या काही भागातून वाहणाऱ्या तिळारी कालव्यातून येत्या शनिवारपासून नियमित पण मर्यादित प्रमाणात पाणी सोडण्यात येणार आहे. तूर्तास दोन क्युबिक पाणी सोडण्याचे आश्‍‍वासन तिळारी जलसिंचन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.

दरम्‍यान, तिळारीतून आता नियमित पाणी सोडण्यात येणार असल्याने शेतकरी आणि बागायतदारांची चिंता तूर्तास मिटणार आहे. तिळारीतून होणाऱ्या अनियमित पाणीपुरवठ्यामुळे साळ, मेणकुरे, अडवलपाल, लाटंबार्से आदी भागातील शेती आणि बागायती धोक्यात आल्‍या होत्‍या.

या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी तिळारी जलसिंचन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांसमवेत एक संयुक्त बैठक झाली. डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली लाटंबार्से पंचायत सभागृहात झालेल्या या बैठकीला तिळारी जलसिंचन खात्याचे कार्यकारी अभियंते मिलिंद गावडे, साहाय्‍यक अभियंते माजिक, अनिल फडते, कनिष्ठ अभियंते मल्लिकार्जुन, भोसले आणि महाराष्ट्र तिळारी जलसिंचन प्रकल्पाचे अभियंते म्हामल उपस्थित होते.

दरम्‍यान, जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, उपसरपंच त्रिशा राणे, पंच कृष्णा आरोलकर, श्रीमती घाडी यांच्यासह शेतकऱ्यांचीही उपस्थिती होती.

Mla Chandrakant Shetya
G-20 Summit Goa 2023: आरोग्य योजनांची यशस्वी अंमलबजावणी

देखभालीचे काम वाढल्‍यामुळे अडचण

कोविडमुळे गेली दोन वर्षे तिळारी कालव्याच्या देखभालीवर परिणाम झाला. यंदा देखभालीचे काम वाढले आहे. त्यामुळे तिळारी कालव्यातून नियमित पाणी सोडणे अडचणीचे बनले आहे.

ही वस्तुस्थिती अधिकाऱ्यांनी या बैठकीत मांडून दोन दिवसानंतर म्हणजेच शनिवारपासून तिळारी कालव्यातून पाणी नियमित सोडण्याचे आश्वासन दिले. आमदार डॉ. शेट्ये यांनी अनियमित पाणीपुरवठ्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com