Missing elderly skeleton Goa
Missing elderly skeleton GoaDainik Gomantak

निर्जनस्थळी गवत कापताना सापडली कवटी आणि हाडे! वाठादेव-सर्वण परिसरात खळबळ; बेपत्ता वृद्धेचा सांगाडा असल्याचा संशय

Bicholim human skeleton found: : डिचोलीतील वाठादेव-सर्वण भागात निर्जनस्थळी मानवी कवटी आणि हाडे आढळून आली असून या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
Published on

डिचोली: डिचोलीतील वाठादेव-सर्वण भागात निर्जनस्थळी मानवी कवटी आणि हाडे आढळून आली असून या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे. दरम्यान, घटनास्थळी मिळालेल्या काही वस्तूंवरून हा सांगाडा वाठादेव येथील बेपत्ता सुमती मांद्रेकर या वृद्धेचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पोलिसांनी पंचनामा करून कवटी आणि हाडे बांबोळी येथे गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठविल्याची माहिती मिळाली आहे. फॉरेन्सिक तपासणीअंती हाडे कोणाची आणि संबंधित व्यक्तीचा मृत्यू नेमका कसा झाला ते स्पष्ट होणार आहे.

Missing elderly skeleton Goa
Goa Crime: मुंगुल गँग वॉरचा आरोपी आता 'पोक्सो'च्या कचाट्यात! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी कुख्यात अमर कुलालच्या आवळल्या मुसक्या

ज्या वृद्धेची ही हाडे असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे, ती सुमती मांद्रेकर या वृद्धा राहत्या घरातून दोन महिन्यांहून अधिक काळापासून बेपत्ता आहेत.

Missing elderly skeleton Goa
Goa Crime: बनावट गिऱ्हाईक बनून पोलीस पोहोचले अन्... गोव्यात मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची केली सुटका; दलालांचे धाबे दणाणले

दोन महिन्यांपासून बेपत्ता

वाठादेव येथील सुमती मांद्रेकर ही वृद्धा दोन महिन्यांपूर्वी अचानक घरातून बेपत्ता झाल्या होत्या. कालपर्यंत त्यांचा ठावठिकाणा लागला नव्हता. सुमती हिच्या घरापासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर ‘धाट’ या निर्जनस्थळी गवत कापताना ही कवटी आणि हाडे आढळून आली आहेत. येथे मिळालेले फाटलेले लुगड आणि अन्य वस्तूंवरून ही हाडे सुमती मांद्रेकर हिचीच असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. सुमती मांद्रेकर ही वृद्धा मानसिकरित्या कमकुवत होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com