Bicholim Water Issue: दिवसभर बत्ती होती गुल; त्यातच पाणीपुरवठाही ठप्प; डिचोलीत नागरिकांची मोठी गैरसाय

Bicholim Water Supply Disruption: पावसाच्या तडाख्यात एकीकडे दिवसभर वीज ‘गुल’ झाली असतानाच डिचोलीत पाणीपुरवठाही ठप्प झाला.
Bicholim Water Supply Disruption
Bicholim Water Supply DisruptionDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: पावसाच्या तडाख्यात एकीकडे दिवसभर वीज ‘गुल’ झाली असतानाच डिचोलीत पाणीपुरवठाही ठप्प झाला. परिणामी, डिचोलीतील विविध भागांतील नागरिकांची मोठी गैरसोय झाली. पहाटेपासून खंडित झालेला वीजपुरवठा सायंकाळी पूर्ववत झाला; मात्र पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत नळ कोरडेच राहिले.

वीजपुरवठ्यात बिघाड झाल्याने पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पातील पाणीपुरवठाही पहाटेपासून पूर्णपणे ठप्प झाला होता. त्यामुळे या प्रकल्पातून पाणीपुरवठा होणाऱ्या डिचोलीतील विविध भागांमध्ये मोठी पाणीटंचाई निर्माण झाली. शुक्रवारी पहाटेपासूनच नळ कोरडे पडल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. रात्री उशिरापर्यंत अनेक भागांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नव्हता.

Bicholim Water Supply Disruption
Cucumber Water: नॅचरल ग्लो हवाय? काकडीचं पाणी ठरतं वरदान; उन्हाळ्यातील बेस्ट एनर्जी ड्रिंक

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे न्हावेली वीज उपकेंद्रात मोठा बिघाड झाला. त्यामुळे त्या वीज साखळीवर अवलंबून असलेल्या भागांमध्ये पहाटेपासून वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज नसल्याने पाणीपुरवठा यंत्रणाही बंद पडली आणि त्याचा थेट परिणाम नागरिकांवर झाला. रात्री उशिरापर्यंत नळ कोरडे राहिल्याने गृहिणींचे अक्षरशः हाल झाले. एकीकडे वीज नसल्याने असह्य उकाडा, तर दुसरीकडे पाण्याअभावी दैनंदिन कामे ठप्प झाल्याने नागरिक, विशेषतः गृहिणी, हैराण झाल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com