Manish Jadhav
उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील पाणी कमी होते. काकडीच्या पाण्यात 95% पाणी असते, ज्यामुळे शरीर दिवसभर हायड्रेटेड राहण्यास मदत होते.
काकडीचे पाणी शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर फेकून देण्यास मदत करते. हे एक नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक असून यामुळे यकृत आणि मूत्रपिंड स्वच्छ राहतात.
काकडीत 'सिल्लिका' आणि व्हिटॅमिन-B मुबलक असते. याच्या नियमित सेवनाने त्वचा तजेलदार, कोमल आणि हायड्रेटेड राहते. उन्हाळ्यातील पुरळ आणि मुरुमांच्या समस्या कमी होतात.
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर साखरयुक्त कोल्ड ड्रिंक्सऐवजी काकडीचे पाणी प्या. यामुळे भूक कमी लागते आणि चयापचय क्रिया (Metabolism) वेगवान होते.
काकडीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते. पोटॅशियम शरीरातील सोडियमचे प्रमाण संतुलित ठेवून उच्च रक्तदाब (High Blood Pressure) नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
काकडीमध्ये व्हिटॅमिन-K मोठ्या प्रमाणात असते. हाडांच्या बळकटीसाठी आणि हाडांमधील कॅल्शियम टिकवून ठेवण्यासाठी काकडीचे पाणी पिणे फायदेशीर ठरते.
उन्हाळ्यात तोंड कोरडे पडल्याने दुर्गंधी येऊ शकते. काकडीतील पोषक घटक लाळ उत्पादनास मदत करतात आणि तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करून श्वासाला ताजेपणा देतात.