RSS: 'महासत्तेसाठी संघ बनणार पंचप्राण'! CM सावंतांचे प्रतिपादन; गणवेषात विजयादशमी उत्सवात झाले सहभागी

CM Pramod Sawant: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त डिचोलीत आयोजित श्री विजयादशमी उत्सवात मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. येथील गणपती पुजन मंडपात हा उत्सव साजरा करण्यात आला.
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली : देशाला महासत्ता बनविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पंचप्राण बनून विविध उपक्रमांच्या माध्यमातून कार्य पुढे नेणार आहे. सामाजिक कर्तव्य मानून प्रत्येकाने या कार्यात सहभागी होणे आवश्यक आहे, असे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त डिचोलीत आयोजित श्री विजयादशमी उत्सवात मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. येथील सार्वजनिक गणपती पुजन मंडपात हा उत्सव साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री हे संघाच्या गणवेषात विजयादशमी उत्सवात सहभागी झाले होते.

साधारण एक तास जमिनीवर बसून त्यांनी प्रमुख वक्त्यांचे प्रबोधन ऐकले. यावेळी अन्य स्वयंसेवकांमध्ये आमदार प्रेमेंद्र शेट आणि डॉ. चंद्रकांत शेट्ये यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी डॉ. के. बी. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पांजली वाहिली.

CM Pramod Sawant
पाकिस्तानी क्रिकेटर म्हणतो, 'जगाला RSS सारख्या संघटनांची गरज'; नेटकऱ्यांनी दिला तिथं शाखा उघडण्यांचा सल्ला

उत्सवाला प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. प्रणय बुडकुले तर प्रमुख वक्ते म्हणून संघाचे गोवा विभाग संघचालक राजेंद्र भोबे उपस्थित होते. ध्वजारोहण केल्यानंतर पहिले सरसंघचालक डॉ. के. बी. हेडगेवार, द्वितीय संघचालक गोळवलकर गुरुजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे तसेच शस्त्रपूजन करण्यात आले.

CM Pramod Sawant
RSS: संघर्ष, सेवा आणि समरसता; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गौरवशाली शतकाची गाथा

यावेळी राजेंद्र भोबे यांचे प्रबोधनात्मक मार्गदर्शन झाले. त्यांनी आपल्या भाषणात स्थापनेपासून आतापर्यंतचे संघाचे कार्य, बंदी आणि आणीबाणीचा काळातील वाटचालीवर प्रकाश टाकला. प्रणय बुडकुले यांनीही यावेळी आपले विचार मांडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com