Cultural Conservation: संस्कृती संवर्धनासाठी पुढे या - श्रीपाद नाईक

श्रीपाद नाईक : मयेतील शारदानगर वेल्फेअरचा वर्धापनदिन साजरा
Shardanagar Welfare Anniversary Celebration in May
Shardanagar Welfare Anniversary Celebration in MayDainik Gomantak
Published on
Updated on

Cultural Conservationआजच्या युवकांनी आपली सर्वांगीण प्रगती करताना संस्कृती संवर्धनासाठी पुढे येणे आवश्यक आहे. असे मत केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले.

मये येथील शारदानगर वेल्फेअर असोसिएशनच्या वर्धापनपनदिन सोहळ्यात ते प्रमुख पाहूणे या नात्याने बोलत होते. शारदानगर येथील श्री हनुमान देवस्थानसाठी खासदार निधीतून सभागृह बांधून देण्याचेही केंद्रीयमंत्री नाईक यांनी जाहीर केले.

शनिवारी (ता.8) आयोजीत या सोहळ्यास खास अतिथी म्हणून मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट उपस्थित होते. अन्य मान्यवरात सरपंच सुवर्णा चोडणकर, असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधर मणेरकर आदींचा समावेश होता.

Shardanagar Welfare Anniversary Celebration in May
Bicholim : बंधाऱ्यावर जात आहात; लहान मुलांना सांभाळा

प्रेमेंद्र शेट यांनी यावेळी बोलताना शारदानगर वेल्फेअर असोसिएशनच्या कार्याची स्तुती करून, शारदानगर वसाहतीत स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.

या सोहळ्यात दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत चांगले यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच महिला नाट्यकलाकारांचा सत्कार करण्यात आला. श्रीधर मणेरीकर यांनी प्रास्ताविक केले. या सोहळ्यानंतर नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com